esakal | गरबा, दांडिया यंदाही नाहीच; व्यावसायिक, विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Garba- Dandiya

गरबा, दांडिया यंदाही नाहीच; व्यावसायिक, विक्रेत्यांना मोठा फटका

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : कोरोना (Corona) प्रादुर्भावाचे संकट अजूनही टळले नाही. यंदाही नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला. दांडिया, गरबा आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दांडिया प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. तर, दांडिया तयार करणाऱ्या कारागिरांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाचा कमी झाल्याने समाधान मात्र उत्सव नसल्याने नाराजी

नवरात्रोत्सव म्हटले, की सर्वांना दांडिया, गरबाचे आकर्षण असते. दांडियाप्रेमी आणि विक्रेते वर्षभर नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी दांडियावर बंदी घातल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव अधिक असल्याने लॉकडाउन होते. यावर्षी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते.

राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळीपासून धार्मिक स्थळ उघडे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव पूर्वीप्रमाणे साजरा होण्याची शक्यता दांडिया प्रेमी आणि विक्रेत्यांना होती. सोमवारी (ता. ४) राज्य सरकारकडून प्रसारित केलेल्या पत्रात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यास बंदी घातली. दांडिया उत्सवाचेदेखील आयोजनास परवानगी नाकारण्यात आली. सर्वत्र नाराजीचे सूर पसरले आहे.

हेही वाचा: त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरात उद्यापासून दर्शन

दोन वर्षात लाखोंचे नुकसान

दांडिया रद्दमुळे केवळ दांडिया प्रेमींचा हिरमोड झाला असे नाही तर दांडिया उत्सवावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिक, विक्रेते यांच्या व्यवसायावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिक विक्रेत्यांचे नऊ दिवसांच्या खरेदी-विक्रीवर वर्षभराचे बजेट अवलंबून असते. गेल्यावर्षी झालेले आर्थिक नुकसान यावर्षीही सोसावे लागत आहे. अनेक दांडिया विक्रेत्यांनी दांडिया तयार करून ठेवलेल्या होत्या. आता त्या दांडियांना मागणी नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही वर्षांचे आर्थिक नुकसान धरले तर लाखोंचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. इतकेच नाही तर नवरात्रामध्ये गंगा-गोदावरी येथील म्हसोबा पटांगणावर जिल्ह्यातून काही आदिवासी बांधव विशेष करून दांडिया विक्रीसाठी येत असतात. त्यांच्यावरदेखील उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा: शाहीन वादळाचा शेवट उत्तर महाराष्ट्रात; मुसळधार पाऊस शक्य

''नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, दांडिया विक्रीतून दोन्ही वर्षाचे नुकसान भरून काढण्याचे आशा वाटत होती. परंतु, यंदाही दांडियावर बंदी घातल्याने अशा धुळीत मिळाली आहे.'' - विजय पवार, विक्रेता

loading image
go to top