esakal | एमएचटी-सीईटीचा २८ ला निकाल; सीईटी सेलतर्फे पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर होणार
sakal

बोलून बातमी शोधा

 exam final.jpg

वैध हरकतींनुसार दुरुस्‍ती प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्‍यानुसार एमएचटी-सीईटी २०२० चे गुणपत्रक व पर्सेंटाइलचा तपशील २८ नोव्‍हेंबरला जाहीर केला जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्‍ही ग्रुपची परीक्षा स्‍वतंत्रपणे घेण्यात आली होती.

एमएचटी-सीईटीचा २८ ला निकाल; सीईटी सेलतर्फे पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर होणार

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेचा निकाल येत्या २८ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांकडून मागविलेल्‍या हरकतींनंतर सीईटी सेलतर्फे याबाबत परीपत्रक जारी करण्यात आले. पीसीएम आणि पीसीबी अशा दोन्‍ही ग्रुपचा निकाल पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. 

निकालही स्‍वतंत्ररीत्‍या जाहीर केला जाणार

निकाल जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्‍या. त्यानुसार एकूण ७९१ हरकती प्राप्त झाल्‍या होत्‍या. यापैकी सर्वाधिक २७८ हरकती गणित विषयक होता. त्यापाठोपाठ भौतिकशास्‍त्र विषयाच्‍या १७३, रसायनशास्त्र- २०९ व जीवशास्‍त्रविषयक १३१ हरकती आल्या. भौतिकशास्त्राच्या शंभर, रसायनशास्‍त्राच्‍या १२५, गणिताच्‍या ११५ आणि जीवशास्‍त्रविषयाच्‍या १२९ अशा एकूण ४६९ हरकती वैध ठरविण्यात आल्‍या असून, ३२२ हरकती फेटाळण्यात आल्‍या आहेत. वैध हरकतींनुसार दुरुस्‍ती प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्‍यानुसार एमएचटी-सीईटी २०२० चे गुणपत्रक व पर्सेंटाइलचा तपशील २८ नोव्‍हेंबरला जाहीर केला जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्‍ही ग्रुपची परीक्षा स्‍वतंत्रपणे घेण्यात आली होती. तसेच, निकालही स्‍वतंत्ररीत्‍या जाहीर केला जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कॅप राउंडची प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी 

अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया आरक्षणासह अन्‍य तांत्रिक मुद्दयांमुळे रखडलेल्‍या आहेत. असे असताना सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर तातडीने पुढील प्रवेशाची प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून केली जाते आहे. कॅप राउंड प्रक्रियेस विलंब न करता या महिन्‍याअखेरीसच ही प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

loading image
go to top