Nashik | सेवानिवृत्त शिक्षकांचे पेंशनसाठी अधिकाऱ्यांना साकडे

Retired-People
Retired-Peopleesakal

पंचवटी (नाशिक) : महानगर पालिकेतील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवृत्तिवेतन मिळण्यास उशीर होत असल्याने या कर्मचाऱ्यांना बँकेत व कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे वृद्धापकाळात आम्ही जावे, कोणाकडे असा सवाल सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला आहे.

वयोवृद्धांनी जावे तरी कोणाकडे?

मनपा शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांचा दसरा सण अतिशय निराशाजनक वातावरणात गेल्याचे म्हटले आहे. शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःचे वेतन घेतले पण निवृत्तांचे निवृत्तिवेतन करण्याचे मात्र विसर पडल्याचे म्हटले आहे. हा त्रास दरमहा सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संबंधितांना हे निवृत्तिवेतन दहा पंधरा तारखेनंतरच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धापकाळात निवृत्तांना बँकेत व कार्यालयात सारख्या चकरा माराव्या लागतात. कार्यालयात फोन करावा तर फोनही उचलत नाही. कधी भेट झाली तर आमच्याकडे काम करायला माणसे नाहीत. आमच्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. अनुदान अजून आलेच नाही, अशी उत्तरे दिली जात असल्याचे निवृत्त शिक्षकांचे म्हणणे आहे. अखेर आम्ही वयोवृद्धांनी जावे तरी कोणाकडे असा प्रश्‍न संबंधितांनी केला आहे.

Retired-People
दिवाळीच्या खरेदीला बाजारात जाताय? भुरट्या चोरांपासून सावधान

अन्यथा वृद्धापकाळी करावे लागेल आंदोलन

सातव्या आयोगाच्या फरकाचे तीन हप्ते मुदत उलटून गेली तरी देत नाही. यासाठी दोन-तीन निवेदने दिली. तेव्हा आतातरी वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी आमच्या प्रश्‍नांकडे सहानुभूतिपूर्वक लक्ष घालून निवृत्ती प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला वृद्धापकाळी आंदोलन करावे लागेल, असे नथुजी देवरे, जयवंत सोनवणे, उत्तमराव देवरे, कारभारी सुतार, लक्ष्मण पाटील, अनिल शिंदे, भास्कर ढाके, पोपट गोजरे, सुधाकर जाधव, शिवाजी जमदाडे, सुधाकर ठाकरे, किसन परदेशी, मंगला गोजरे, पुष्पा शिरसाट, सुमन निकम, बाजीराव पवार, शिवदास भंडारी, हमीद शेख आदींसह अन्य निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी केले आहे.

Retired-People
नाशिक : घरच्या घरीच उपचारामुळे लेकीचा मृत्यु, वडिलांविरोधात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com