तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करत बळकावलेली जमीन मूळमालकाला परत

तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करत बळकावलेली जमीन मूळमालकाला परत
SYSTEM

इगतपुरी (जि. नाशिक) : दिंडोरीतील आंबेवणी (घोडेवाडी) येथील आदिवासी जमीन गेल्या २९ वर्षापासून बिगर आदिवासीने तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करून कब्जा केला होता. बिरसा मुंडा ब्रिगेडने ग्रामसभा घेत संबंधितांना सर्व बाजू समजावू सांगत तसा ठराव करण्यात आला.त्यानुसार ती जमीन मूळ मालकांना परत करण्यात आली.

कोर्ट, पोलिस ठाण्यापर्यंत जाऊनही यावर तोडगा निघत नव्हता. शेवटी ॲड. यशवंत पारधी (बिरसा ब्रिगेड समन्वयक), शशिकांत करवंदे, वासाळी येथील काशिनाथ कोरडे, जिल्हाध्यक्ष अनिल गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली बिरसा ब्रिगेडने ग्रामसभा घेत न्याय्य बाजू पटवून दिली. उभयतांनी ती मान्य केली. घोडेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ६४२ या जमिनीवर तलाठी सर्कल यांच्या मदतीने ताराबाई सुका घोडे हिला वारस लावून काशिनाथ सुका घोडे आणि रामकृष्ण सुका घोडे यांची बहीण दाखवून कब्जा मिळविला होता. ती पुन्हा मिळवण्यासाठी गावपंचायतीत ग्रामसभेत ठराव घेउन पुन्हा मूळ मालकांना मिळवून दिली अशी माहिती इगतपुरी येथील बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल गभाले यांनी दिली.

तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करत बळकावलेली जमीन मूळमालकाला परत
नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे बंपर पिक; 2 लाख हेक्टरवर विक्रमी लागवड

बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित भारमल, सर्जेराव भारमल, केतन तातळे, दत्ता जाधव, सुनील शेळके, शशिकांत सोनवणे, किरण घोडे, खंडू भारमल, रामदास भारमल, संतोष भारमल, गणेश घोडे, विलास कडाळी, तकदीर कडाळी, आकाश घोडे, बाळू गोडे चेतन कडाळी, दीपक जाधव आदीनी बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जल, जंगल, जमिनीची लढाई अगदी विधानभवनापर्यंत पोहचवली होती.

तलाठ्याच्या मदतीने खोटी वारस नोंद करत बळकावलेली जमीन मूळमालकाला परत
ओबीसी विधेयकावरुन हरिभाऊ राठोडांची सरकार, विरोधकांवर सडकून टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com