‘रिवॅम्‍प मोटो’ने साकारली बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’

नाशिकच्‍या स्‍टार्टअपचा आविष्कार; गुंतवणूकदार, ग्राहकांचे वेधले लक्ष
‘रिवॅम्‍प मोटो’ने साकारली बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’
Summary

नाशिकच्‍या स्‍टार्टअपचा आविष्कार; गुंतवणूकदार, ग्राहकांचे वेधले लक्ष

नाशिक : सध्या इलेक्ट्रिकल व्हेईकलचा (eletrical vechiele) जमाना आहे. पण हे वाहन केवळ दळणवळणापुरतेच मर्यादित न ठेवता वापरकर्त्यांना त्‍यांच्‍या गरजा व आवश्‍यकतेनुसार वेगवेगळ्या उपयोगात आणता येईल, असे वाहन ‘रिवॅम्‍प मोटो’ यांनी विकसित केले आहे. नाशिकचे स्टार्टअप असलेल्या ‘रिवॅम्प मोटो’ने ही बहुपयोगी ‘आरएम मित्रा’ दुचाकी साकारली आहे. जयेश टोपे, प्रीतेश महाजन आणि पुष्कराज साळुंके यांच्‍या या स्‍टार्टअपला (startup)गुंतवणूकदारांचा, तर वाहनाला ग्राहकांचा आत्तापासून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्‍हणजे सोनी वाहिनीवरील ‘शार्क टँक’ या कार्यक्रमासाठी या स्‍टार्टअपची निवड झाली असून, ते राष्ट्रीय स्‍तरावर झळकणार आहे.

जयेश, प्रीतेश आणि पुष्कराज हे तिघेही नाशिकचे (nashik) भूमिपुत्र असून, त्‍यांनी मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. टीसीएसच्‍या(tcs) डिजिटल इम्‍पॅक्‍ट(digitaL EMPACT) स्‍क्‍वेअरमधील मार्गदर्शक निखिल देवरे यांच्‍यामुळे तिघे एकत्र आले. पहिल्‍याच भेटीत तिघांनी स्‍टार्टअप निर्मितीचा निर्धार व्यक्त केला. सप्‍टेंबर २०२० मध्ये ही भेट झाली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभरात स्‍टार्टअपचा विस्‍तार करून तिघांनी मोठे यश मिळविले. हाय स्पीड ‘आरएम मित्रा’च्‍या तंत्रज्ञानासाठी पेटंट, तसेच ट्रेडमार्कची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शासनाचे अनुदान मिळत असल्‍याने हे वाहन ४५ ते ६० हजार रुपयांपर्यंत उपलब्‍ध होऊ शकते.

‘रिवॅम्‍प मोटो’ने साकारली बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’
सपा, बसपाची आश्वासने आम्ही पूर्ण केली; राजनाथ सिंह

अपयशातून घेतली शिकवण

जयेश, प्रीतेश आणि पुष्कराज यांनी सुरवातीला वैयक्‍तिक स्‍टार्टअप उभारले आहेत. जयेशने ‘व्‍हेजिटोफार्म’ हे स्‍टार्टअप कोरोनाकाळात सुरू केले. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचविताना उलाढाल २० ते २५ लाखांपर्यंत नेली. परंतु, इलेक्ट्रिक व्‍हिकलविषयीच्या प्रेमापोटी तो पुन्‍हा आपल्‍या स्‍वप्‍नाकडे वळला. पुष्कराजनेदेखील इलेक्‍ट्रॉनिक्‍स सर्किट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स सोल्‍यूशन्सशी निगडित स्‍टार्टअप चालविले आहे. तर प्रीतेशने एसबीआयमध्ये नोकरी करताना अर्धवेळ विविध संकल्‍पनांवर काम करण्यासाठी स्‍टार्टअप सुरू केले. या तिघांनी आपल्‍या पहिल्‍या टप्प्‍यातील या अनुभव व चुकांतून शिकत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा केल्‍या.

‘रिवॅम्‍प मोटो’ने साकारली बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’
आम्ही आश्वासने पूर्ण केली; भाजपच्या आश्वासनांचं काय? : राहुल गांधी

कुणी सोडली नोकरी, तर कुणी परदेश दौरा

अगदी शिक्षणासाठी यूकेला जाण्याच्‍या तयारीत असलेल्‍या प्रीतेशने ऐनवेळी निर्णय बदलत स्‍टार्टअपमध्ये सहभाग नोंदविला. स्‍टार्टअपला बळकटी देण्यासाठी चांगल्‍या टीमची आवश्‍यकता होती. अशात यापूर्वी महाविद्यालयीन स्‍तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या आपल्‍याच काही साथीदारांना विचारणा केली. अंतिम वर्षात असलेल्‍या या आठ जणांना तसे नामांकित कंपन्‍यांत चांगल्‍या पॅकेजच्‍या संधी उपलब्‍ध होत्या. परंतु, त्‍या धुडकावत रिवॅम्‍प मोटोची टीम अधिक बळकट झाली. आता हे आठही संस्‍थापक सदस्‍य झाले आहेत.

आधीपासून इलेक्ट्रिकल व्‍हिकल निर्मितीची आवड होती. एकाच ध्येयाने झपाटलेले आम्‍ही एकत्र आलो व आमची चांगली टीम तयार झाली. बहुपयोगी अशी ‘आरएम मित्रा’ ही प्रत्‍येक समाज घटकासाठी उपयुक्‍त ठरेल. आम्‍हाला गुंतवणूकदार तसेच, ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- जयेश टोपे, संस्‍थापक, रिवॅम्‍प मोटो

‘रिवॅम्‍प मोटो’ने साकारली बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’
पाणी योजना देताना ‘नो पार्टी डिफरन्स’; गुलाबराव पाटील

अशी आहे संकल्‍पना

केवळ दळणवळणासाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा मर्यादित वापर न ठेवता समाजातील प्रत्‍येक घटकाला त्‍यांच्‍या गरजेनुसार वापरता येईल, अशी वाहनाची रचना केली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीपासून तर छोट्या व्‍यावसायिकाला ‘शॉप ऑन टू व्‍हिल’, व्‍यवसायातील माल वाहतूक, दिव्‍यांगांना सुलभ प्रवासापासून तर तरुणाईला स्‍पोर्ट लूकचे वाहन असे बहुपयोगी वापर या वाहनाचे आहेत. विशेष म्‍हणजे गरजेनुसार या वाहनाची रचना घरच्‍या घरीच करता येते. कॉर्पोरेटलाही उपयोगासाठी व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर उपलब्‍ध करून दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com