फाळके स्मारकाचे पुनर्जीवन; आयुक्तांकडून ग्वाही | Latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dadasahbe Falke memorial latest marathi news

फाळके स्मारकाचे पुनर्जीवन; आयुक्तांकडून ग्वाही

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून उतरती कळा सोसणाऱ्या चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या स्मारकाला पुनर्जीवित केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुढाकार घेतला असून, पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. (Revival of Phalke Monument Testimony by NMC Commissioner Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Admission 2022 : अकरावीचे 3 दिवसांत 26 टक्‍के जागांवर प्रवेश

आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (ता. ५) दादासाहेब फाळके स्मारकाची पाहणी केली. मिनी थिएटर, संगीत कारंजे, वॉटर पार्क, दादासाहेब फाळके यांचा पोस्टर हॉल, बुद्ध स्मारकालाही त्यांनी भेट दिली.

स्मारकाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाने यांनी आयुक्तांना स्मारकाबाबत माहिती दिली. कोरोना काळात बंद असल्याने स्मारकातील काही गोष्टींवर परिणाम झाला. मात्र आता महापालिकेकडून काही दुरुस्तीची कामे केली जातील.

लवकरच स्मारक पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित होईल, नागरिकांना आनंद लुटता येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली. फाळके स्मारकाला पुनर्जीवित करण्यासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी स्मारक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ, उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: शहरात वाहतूक कोंडी झाली नित्याचीच

Web Title: Revival Of Phalke Monument Testimony By Nmc Commissioner Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..