
Nashik : पाण्याच्या मागणीत वाढ; मनपाकडून 10 टँकरची सोय
नाशिक : उन्हाचा कडाका (Rising temprature) वाढल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरातील वेगवेगळ्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा (Water Crisis) होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची उचल वाढविलेली नसली तरी, महापालिकेने (NMC) टंचाईला तोंड देण्यासाठी मागणी होताच पाणीपुरवठ्यासाठी दहा टँकरची सोय केली आहे.
नाशिक शहरात पाण्याच्या मागणीत वाढ झाली असली तरी काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील सहा विभागांमध्ये एकूण दहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. सिडकोसह शहरातील नववसाहत आणि काही ठिकाणी गावठाण भागातील वसाहतीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. पाण्याची मागणी वाढली असली तरी महापालिका पाण्याचे उचल करण्याच्या क्षमतेत वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: 'कलिंगड खावायेना अन् लिंबू पाव्हाले मिळेना'
सध्या नाशिक महापालिका सुमारे ५४२ एमएलडी पाणी उचलते. उन्हाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर साधारण दोन एमएलडी पाणी उचलावे लागते. शहराला काही प्रमाणात कमी पडत असल्यामुळे महापालिकेला पाण्याची उचल करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक घेतल्यानंतर पाणी उचलण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शहरातील सर्व सहा विभागांमध्ये एक याप्रमाणे सहा टँकर सुरू होते. मात्र, गत दोन दिवसांमध्ये नाशिक रोड, पंचवटी, सिडको तसेच पश्चिम विभागामध्ये एक अतिरिक्त पाण्याचा टँकर सुरू करण्यात आल्यामुळे टँकरची संख्या दहा झाली आहे. नागरिकांची आणखी मागणी आल्यावर त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यावर डिझेल टाकून जाळले; 13 जणांवर गुन्हा दाखल
Web Title: Rising Demand For Water Nmc Provides 10 Tankers Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..