नाशिक : पालेभाज्यांच्या दरांत मोठी वाढ | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leafy vegetables

नाशिक : पालेभाज्यांच्या दरांत मोठी वाढ

पंचवटी (नाशिक) : एकीकडे सर्वच वस्तूंच्या दरांत मोठी वाढ झालेली असल्याने अनेकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बाजार समितीतील आवक 50 टक्क्याने घटल्याने पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

रशिया- युक्रेन युद्धाच्या परिणाम

रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरानेही उच्चांक गाठला आहे.

गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

पर्यायाने सर्वच प्रकारच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका महागाई (Inflation) वाढण्यात झाला असून, गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच उन्हाच्या तडाख्याने नाशिक बाजार समितीतील सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकेत पन्नास टक्के घट झाली आहे. आवक घटल्याने त्याचा परिणाम पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाजीपाल्यावर होऊन घाऊक बाजारात पस्तीस टक्क्यांच्या आसपास, तर किरकोळ बाजारात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकच्या भाववाढीत झाला आहे.

हेही वाचा: लग्नातील स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ

कांदे, बटाट्याच्या मागणीत वाढ

उन्हाळा म्हटला, की महिलांची वर्षभरासाठी लागणाऱ्या मिरची, मसाला तयार करण्याची लगबग सुरू होते. मसाल्यासाठी लागणारा-या उन्हाळी कांदाची किरकोळ बाजारात मोठी आवक झाली आहे. लहान आकारातील कांदा आठ ते दहा रुपये तर मोठ्या आकारातील किलोभर कांद्यासाठी बारा ते पंधरा रुपये मोजावे लागत होते. याशिवाय वेफर्स, किस करण्यासाठी बटाट्याच्या मागणीतही वाढ झाल्याने ते २० ते ३० रुपये किलो दराने उपलब्ध होते.

हेही वाचा: वाहन तपासणीत 15 ते 40 रुपयांपर्यंत वाढ; महागाईमुळे सुधारित नवे दर लागू

बाजार समितीतील पालेभाज्यांची आवक व दर (रुपयांमध्ये)-

पालेभाजी आवक (शेकडा) कमीत- कमी जास्तीत- जास्त सरासरी

१. कोथिंबीर (गावठी) ६३२०० जुडी २००० ६००० ४०००

कोथिंबीर (हायब्रीड) ६३२ जुडी १५०० ५००० ३२००

२. मेथी ६५०० जुडी २५०० ३५०० ३०००

३. शेपू ७४५० जुडी १७०० ३४०० २५५०

४. कांदापात १२६०० जुडी १२०० ३५०० २५००

Web Title: Rising Prices Of All Vegetables Due To Income Decreased And Rising Temprature In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top