esakal | डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! साठा मर्यादेवर व्यापारांतून हास्यास्पद प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : डाळींचे वाढलेले भाव कोरोनाकाळातही टिकून आहेत. मध्यंतरी व्यापाऱ्यांनी डाळींच्या साठा मर्यादाबद्दल आंदोलनातून नाराजी प्रकट केली आहे. त्यानंतरही साठा मर्यादेतून आयातदारांना सवलत देत केंद्र सरकारने साठा मर्यादा निश्‍चित केली. किरकोळ विक्रेता पाच टन डाळींची साठवणूक कुठे करतात, असा प्रश्‍न उपस्थित करत व्यापाऱ्यांमधून साठा मर्यादा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया उमटली. (Rising-prices-of-pulses-Surviving-Corona-period-marathi-news-jpd93)

व्यापारी म्हणताहेत साठा मर्यादा हास्यास्पद

उन्हाळी पदार्थ करण्यासाठी उडीद डाळीची मागणी अधिक असते. सद्यःस्थितीत उडीद डाळीचा हंगाम नसला, तरीही या डाळीचा किलोचा भाव शंभर ते १०२ रुपये असा आहे. दिवाळीनंतर हरभरा डाळीची आवक सुरू होते. आता हरभरा डाळ ७० ते ७६ रुपये किलो भावाने विकली जात आहे. तूरडाळ आणि मूगडाळीचा भाव किलोला शंभर ते ११५, तर मूसरडाळ ८० ते ८२ रुपयांपर्यंत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळींचे भाव वाढलेले नाहीत. सरकारला अपेक्षित असलेली भाववाढ झाली नसल्याने साठा मर्यादा ही सुपीक कल्पना यंत्रणेच्या डोक्यातून आल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, तूरडाळ बर्मा, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, तर हरभरा डाळ बर्मा, ऑस्ट्रेलियामधून आणि मूगडाळ बर्मा, ऑस्ट्रिया, ब्रह्मदेशातून आयात केली जाते. देशात गेल्या काही दिवसांपूर्वी ४० लाख टन डाळींची आयात व्हायची. ती आता घटत चालली आहे.

घाऊक व्यापाऱ्यांसाठी ५०० टनाची मर्यादा

केंद्र सरकारने घाऊक विक्रेत्यांसाठी ५०० टन डाळींची साठवणूक मर्यादा निश्‍चित केली आहे. गिरणी मालकांसाठी मर्यादा सहा महिन्यांचे उत्पन्न अथवा वार्षिक क्षमतेच्या ५० टक्के यापैकी जे अधिक असेल ती ठरवण्यात आली आहे. डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून निर्णय घेतल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: महिंद्राने परत मागविली नाशिकमध्ये तयार झालेली ६०० वाहने

हेही वाचा: आरती केली मंत्र्यांनी; गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांवर

loading image