
Nashik News : विधी संघर्षित मुलाकडून 6 लाखाचा ऐवज जप्त
सिडको : अंबड पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांकडून सहा लाखाचा ऐवज हस्तगत केला. बडदेनगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानाबाहेर काही मुले हातात पिशवी घेवुन फिरताना लाख- लाख रुपये वाटून घेण्याच्या गप्पा मारत आहे.
त्यांच्याजवळील पिशवीमध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू आहे, अशी माहिती अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकास मिळाली. (Ritual conflicts 6 lakh seized from children by crime squad Nashik News)
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
हेही वाचा: Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप
सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, योगेश शिरसाट, मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, समाधान शिंदे यांनी सापळा रचून तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ५, ४३, ००० व एक ५० हजार रुपये किमतीची सोन्याची १० ग्रॅम वजनाची अंगठी, असा ५, ९३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा: Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस