Nashik Central Jail
sakal
नाशिक: कारागृहातील बंदी आणि त्यांच्या नातलगांना संपर्कासाठी शासनाने दिलेल्या स्मार्टफोन सुविधा कार्डचा (ॲलन कार्ड) गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात समोर आली आहे. कारागृहाच्या शिपायानेच बंदीशी संगनमत करीत बनावट सही, शिक्क्यांचा वापर करीत ॲलन कार्डचे बेकायदेशीररीत्या वाटप केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुण्याच्या कारागृह दक्षता पथकाने केलेल्या चौकशीनंतर नाशिक रोड पोलिसांत संशयित कारागृह शिपाई आणि बंदीसह संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.