Crime
sakal
नाशिक रोड: नाशिक रोड परिसराही खुनाचे सत्र सुरू असून, मालमत्तेच्या वादातून उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौहान मळा, सद्गुरूनगर येथे एकावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याने नाशिक रोड पुन्हा हादरले आहे. अमोल मेश्राम (वय ४३, रा. जय भवानी रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी कुणाल सौदे (२१) आणि अमन शर्मा (१८) यांना अवघ्या तीन तासांत ताब्यात घेत अटक केली.