Crime
sakal
पंचवटी: दरोड्याच्या तयारीसाठी थांबलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी हटकले. या वेळी त्यांनी पळ काढला आणि पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग केला. मंगळवारी (ता.९) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील वाढवणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग सेंटरसमोर हा थरार रंगला. यात चौघे शस्त्रधारी दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले; तर सराईत समीर प्रमोद देशमुख-पाटील (वय २९, रा. हनुमाननगर, मलकापूर, जि. बुलढाणा) यास पोलिसांनी अटक केली.