Nashik Crime News : सिन्नर तालुक्यात एकाच रात्री 2 घरफोड्या; 8 तोळे सोन्याचे दागिने लांबवले

robbery in 2 houses in one night nashik crime news
robbery in 2 houses in one night nashik crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातील दोडी आणि दापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या. यात दोन ठिकाणी घरातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून दोन महिला जखमी झाल्या. (robbery in 2 houses in one night nashik crime news)

तर एका पुरुषाची प्रकृती अत्त्यवस्थ आहे. चोरट्यांनी या घटनेत सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबवलयाचे सांगण्यात येते.

दोडी-दापूर रस्त्यावर दापूर शिवारात काकड मळा येथील छबू हरी आव्हाड यांचे घराचा दरवाजा उघडून मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी प्रवेश केला. आव्हाड यांचा मुलगा सुनील व त्याची पत्नी सविता हे दोघे झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी मोर्चा वळवला. हातातील लोखंडी वस्तूंनी या दोघांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी पत्नी सविता हिच्या अंगावरील व घरातील सुमारे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने व घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या मारहाणीत सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नांदूर शिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र डोक्याची दुखापत गंभीर असल्याने संगमनेर येथे सिटीस्कॅन साठी पाठवण्यात आले. कान ते हनुवटी दरम्यान मोठी जखम असल्याने त्यांना जवळपास चाळीस टाके टाकण्यात आले. तर सविता आव्हाड या देखील जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

robbery in 2 houses in one night nashik crime news
Crime: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतिकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

घरफोडीचा दुसरा प्रकार दोडी

दापूर रस्त्यावरील दोडी शिवारात भारत बन्सी सदगीर यांच्या वस्तीवर घडला. चोरट्यांनी दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडत प्रवेश केला. यावेळी ताई भारत सदगीर यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हस्तगत केले. ताई सदगीर यांच्या कानाची पाळी देखील तुटली. त्यांना देखील नांदूरशिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रात्री अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याच दरम्यान सदगीर वस्ती जवळ असलेल्या बाळू विठ्ठल केदार यांच्या घराच्या पडवीचा सेफ्टी डोअर उघडून चोरट्यांनी पडवीत असलेली जुनी लोखंडी पेटी उचलून नेली. या पेटीत शेती अवजारे व पाईपलाईनचे लोखंडी सुट्टे भाग ठेवलेले होते.

शेजारीच असलेल्या तात्याबा दामोदर आव्हाड यांच्या घराचा आतून बंद असलेला दरवाजा उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने ते पळून गेले. जाताना चोरट्यांच्या हातातील कटावणी, लोखंडी गज या वस्तू आव्हाड्यांच्या अंगणात पडल्या होत्या.

दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिन्नर, एमआयडीसी तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयातील दरोडा प्रतिबंधक गस्तीवरील वाहने देखील दापूर येथे दाखल झाली. पहाटेपर्यंत परिसरात संशयितांचा शोध घेतला जात होता. सकाळी रुग्णालयात जाऊन पोलिसांनी जखमींचा जाबजबाब घेतला.

robbery in 2 houses in one night nashik crime news
Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! ७० वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com