Ultraman Triathlon : रोहित पवार झाला भारताचा वेगवान अल्ट्रामॅन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

Ultraman Triathlon : रोहित पवार झाला भारताचा वेगवान अल्ट्रामॅन!

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर कॉलनीतील डॉ. सुभाष व सौ. शीतल पवार यांचा अमेरिकास्थिती अभियंता असलेला मुलगा रोहित पवार (३६)ने जगातील सर्वात अवघड समजली जाणारी ‘अल्ट्रामॅन’ ही स्पर्धा जिंकून भारताचा द्वितीय क्रमांकाचा अतिजलद ‘अल्ट्रामॅन’ स्पर्धक म्हणून पात्र ठरला आहे.

त्याने ३६ तासाची ट्रायथॅलॉन (स्विमींग, सायकलिंग, रनींग) ही स्पर्धा केवळ २७ तास ५६ मिनिटांत जिंकली. (Rohit Pawar from satpur became Indias fastest ultraman at Ultraman Triathlon florida nashik news)

अमेरिकेच्या फ्लोरीडा येथील क्लेरमाँट या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत जगातल्या १४ विविध देशातील ३४ स्पर्धंकांनी भाग घेतला होता. ज्यांनी पूर्वी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा कमीत कमी वेळात जिंकली आहे, अशांना निकषाद्वारे या स्पर्धेत संधी मिळते.

रोहितने देस मोईंस येथील १७ तासांची आयर्नमॅन स्पर्धा केवळ १२ तासांत जिकल्याने त्याला या स्पर्धेत संधी मिळाली. अल्ट्रामॅन या ३ दिवसाच्याया स्पर्धेत पहिल्या दिवशी १० कि.मी. स्विमींग व १४५ कि.मी. सायकलिंग, दुसऱ्या दिवशी २८० किमी सायकलिंग अशी एकूण ४२५ किमी. सायकलिंग व तिसऱ्या दिवशी ८५ किमी रनिग करावयाचे असते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

रोज १२ तासाचा कट ऑफ टाईम असून ३६ तासात ही स्पर्धा पूर्ण करायची असते. रोहितने १० कि.मी. स्विमींग ४.११ तासात, ४२५ कि.मी. सायकलिंग १४.५१ तासात व ८५ कि.मी. रनींग ८.५२ तासात संपवुन ३६ तासाची ही स्पर्धा वेळेच्या ८ तास ४ मिनिटे आधीच जिंकली.

३४ स्पर्धकांपैकी पहिल्या दिवशी ११ व्या स्थानावर असणार्‍या रोहितने तिसऱ्या दिवशी स्पर्धा संपताना नवव्या स्थानावर झेप घेत पहिल्या १० मध्ये स्थान मिळविले व भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा अतिजलद अल्ट्रामॅन स्पर्धा जिंकणारा विक्रमवीर ठरला. प्रकृती साथ देत नसतानाही त्याने जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ही स्पर्धा जिंकली.