Nashik Ramesh Bais : ...तर राज्‍यपालांची गाडी अडवू; विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांची भूमिका

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्‍याकडून नाशिक उपकेंद्रासंदर्भात सुरू असलेली अडवणूक व इतर विविध मागण्यांसंदर्भात विद्यार्थी संघटनांनी बुधवारी (ता. ३) आक्रमक भूमिका घेतली.
Governor Ramesh Bais in Nashik on 5th january
Governor Ramesh Bais in Nashik on 5th januaryesakal

Nashik Ramesh Bais : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्‍याकडून नाशिक उपकेंद्रासंदर्भात सुरू असलेली अडवणूक व इतर विविध मागण्यांसंदर्भात विद्यार्थी संघटनांनी बुधवारी (ता. ३) आक्रमक भूमिका घेतली.

विद्यापीठातर्फे मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्‍यास ‘गनिमी कावा’ करताना शुक्रवारी (ता. ५) नाशिक दौऱ्यावर येत असलेले राज्‍यपाल रमेश बैस यांचे वाहन अडवणार असल्‍याची भूमिका विद्यार्थी संघटनांच्‍या वतीने ॲड. अजिंक्‍य गिते यांनी जाहीर केली.(Role of student organizations for various demands to governor ramesh bais nashik news)

वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्‍या विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेताना भूमिका स्‍पष्ट केली. ॲड. अजिंक्‍य गिते म्‍हणाले, की विद्यापीठाकडे साडेतीनशे कोटी रुपयांच्‍या ठेवी असताना उपकेंद्रासाठी दहा कोटी रुपये उपलब्‍ध करून दिले जात नसल्‍याची संतापजनक बाब आहे.

प्राध्यापकांच्‍या पदोन्नतीसंदर्भात समिती गठित करण्यात चालढकल केली जात असून, यामुळे प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होत आहे. माजी कुलगुरू डॉ. नितीन कळमळकर हे सध्याच्‍या कुलगुरूंना ‘ड्राईव्‍ह’ करत असल्‍याचा खळबळजनक आरोप त्‍यांनी या वेळी केला.

कार्यकाळ पूर्ण झाल्‍यानंतरही विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी आडमार्गाने डॉ. कळमळकर यांनी विद्यापीठात ठाण मांडले असून, विद्यापीठ खर्चावर इस्राईलचा दौरा त्‍यांनी केला असल्‍याचा आरोपही या वेळी केला.

Governor Ramesh Bais in Nashik on 5th january
Governor Ramesh Bais Nashik: राज्यपाल रमेश बैस मंगळवारी नाशिक दौऱ्यावर; जिल्हा परिषदेकडून जोरदार तयारी

जय कोतवाल म्‍हणाले, की ७५ वर्षांपासून उपकेंद्राचा प्रश्‍न खडलेला आहे. विद्यापीठाला सर्वाधिक महसूल नाशिक व नगर येथील महाविद्यालयांच्‍या माध्यमातून मिळत आहे. असे असताना उपकेंद्राबाबत दुजाभाव केला जातो आहे. याप्रसंगी समाधान बागूल, ॲड. अभिजित गोसावी, विद्यासागर घुगे, रवी पगारे आदी उपस्‍थित होते.

प्रकटन कुणी जाहीर केले?

विद्यापीठाच्‍या वादग्रस्‍त कारभारासंदर्भात अधिसभा सदस्‍याने पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचारासह इतर गंभीर आरोप केले. यानंतर विद्यापीठाने प्रकटन संकेतस्‍थळावर अपलोड करत संबंधिताचे खंडण केले. या प्रकटनावर कुणाचीही स्‍वाक्षरी नसून, हे प्रकटन कुणी अपलोड केले, असा प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.

...अशा आहेत मागण्या

नाशिक उपकेंद्र उभारणीची अडवणूक थांबवावी व कामाला गती द्यावी. विद्यापीठाने जाहीर केलेली ‘एसओपी’ मागे घ्यावी व विद्यार्थी व संघटनांना त्‍यांच्‍या हक्‍कांसाठी लढण्याचा अधिकार अबाधित ठेवावा. आवश्‍यक समिती गठित करून प्राध्यापकांच्‍या पदोन्नतीच्‍या प्रक्रियेला गती द्यावी.

भीक मांगो आंदोलनाची तयारी

शुक्रवारी (ता. ५) राज्‍यपालांचे वाहन अडवताना आंदोलन छेडण्याचा पवित्रा या वेळी घेण्यात आला. यानंतरही अडवणूक थांबली नाही, तर ‘कुलगुरुरू हटाओ, विद्यापीठ बचाओ’ अभियान हाती घेतले जाईल. याअंतर्गत स्‍वाक्षरी मोहीम राबविण्यासह उपकेंद्र उभारणीच्‍या निधी संकलनासाठी ‘भीक मांगो आंदोलन’ केले जाणार असल्‍याचे ॲड. गिते यांनी जाहीर केले.

Governor Ramesh Bais in Nashik on 5th january
Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिकमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com