Nashik Sports Update : रोइंगपटू अनुष्काची सुवर्णपदकावर मोहर; खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत निवड

Anushka Ambekar
Anushka Ambekaresakal

पिंपळगाव बसवंत : लहरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालो की कभी हार नही होती...हरिवंशराय बच्चन लिखित कवितेच्या या ओळी बहुधा पिंपळगावच्या अनुष्का आंबेकर हीने मनावर कोरल्या असाव्यात.

कारण प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करताना रोइंगपटू अनुष्काने सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नौका २०० मीटरचे अवघ्या एका मिनिटात पार करून सुवर्ण पदावर मोहर उमटवत अंजिक्य पद पटकावले. कृष्णा नदीपात्रातील वेगवान कामगिरीमुळे अनुष्काची खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झाली आहे. (Rowing player Anushka stamp winning gold medal Selection in Khelo India National Tournament Nashik Sports News)

Anushka Ambekar
Nashik Sports Update : दिव्यांग खेळाडू दिलीप गावितचे यश!

टेलरिंगचे काम करणारे संतोष आंबेकर यांची कन्या अनुष्का ही शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार तशी खेळामध्ये ही विशेष आवड होती. पिंपळगावच्या वाघ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रा. हेमंत पाटील यांनी अनुष्काचे ध्येयवेड बघून नौकानयन खेळात भविष्य असल्याचे अनुष्काला पटवून दिले. प्रा. पाटील यांचा लाखमोलाचा सल्ला अनुष्काने मनावर घेत पिंपळगावच्या कादवा नदीपात्रात दररोज दोन तास नौकानयनचा कसून सराव सुरू केला. जिद्दाला आत्मविश्‍वासाची जोड व शारीरीक ताकद या बळावर अनुष्काने जिल्हा व विभागीय स्पर्धेत जोरदार कामगिरी केली.

दोनशे मीटरचे अंतर अवघ्या मिनिटात

सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात अनुष्का आंबेकरने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. अंतिम सामन्यात वाऱ्याच्या वेगाने नौका हाकत २०० मीटर अंतराची स्पर्धा अवघ्या एका मिनिटात पूर्ण करून अनुष्काने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्या कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. पुढील स्पर्धेसाठी कादवा नदीत दररोज दोन ते तीन तासाचा सराव सुरू झाला असून प्रा. हेमंत पाटील, अरुण मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Anushka Ambekar
Nashik Sports News : महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

सुवर्णपदक प्राप्त अनुष्काचा पिंपळगाव ग्रामपंचायतीत सदस्या छाया पाटील, सोनाली जाधव, प्रतिभा बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच भास्कर बनकर, उपसरपंच किशोर मोरे, राजेश पाटील, राहुल बनकर, सदस्य विनायक खोडे, सत्यजित मोरे, अमोल बागूल, केशव बनकर, भारत मोगल, दशरथ मोरे, दत्तू मोरे, ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम, संतोष आंबेकर आदी उपस्थित होते.

"दररोज दोन-तीन तासाच्या सरावात सातत्य ठेवले. स्पर्धा जिंकायची या जिद्दीने सहभाग घेतला. प्रा. हेमंत पाटील यांनी दिलेल्या सल्ले लक्षात ठेवून स्पर्धेत उतरले. सुवर्ण पदकाचा आनंद शब्दात सांगता न येणारा आहे. आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे."

-अनुष्का आंबेकर, रोइंगपटू, पिंपळगाव बसवंत.

Anushka Ambekar
Jalgaon News : पतंगाच्या दोरी लुटताना जीवनाची दोरी तुटली तर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com