esakal | कोरोना युद्धात वीरमरण...त्यांच्या शौर्याला लाखो सलाम...पोलीस कुटुंबियांना शासकीय मदत प्रदान!
sakal

बोलून बातमी शोधा

police-nashik-ruler.jpg

जिल्हाभरात फक्त मालेगावात कोरोना विषाणूने एप्रिल-मे महिन्यात अक्षरश: थैमान घातले. याच दरम्यान, जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळख्यात घेतले आणि त्यांची झुंज अपयशी ठरली. या शहीद पोलिसांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते.

कोरोना युद्धात वीरमरण...त्यांच्या शौर्याला लाखो सलाम...पोलीस कुटुंबियांना शासकीय मदत प्रदान!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : नव्याने उद्‌भवलेल्या कोरोना विषाणूविरोधात कर्तव्य बजावत असताना नाशिक जिल्ह्यातील तीन पोलिस शहीद झाले. जीवाची जोखीम पत्करून सेवा बजाविणाऱ्या दोघा पोलिस कुटूंबियांना प्रत्येकी 60 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी या शहीद पोलिस कुटूंबियांची भेट घेत त्यांच्या कार्याला सलाम केला. 

अदृश्‍य शक्तीविरोधात रस्त्यावर पहारा

एरवी गुन्ह्यांचा तपास करण्यात व्यस्त असलेल्या पोलिसांसमोर गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनासारख्या अदृश्‍य शत्रूंपासून आपल्या माणसांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आली. मात्र राज्यभरातील पोलिसांनी जीवाची जोखीम पत्करून या अदृश्‍य शक्तीविरोधात रस्त्यावर पहारा दिला. या नाशिक ग्रामीणचे पोलिसही मागे राहिले नाहीत. जिल्हाभरात फक्त मालेगावात कोरोना विषाणूने एप्रिल-मे महिन्यात अक्षरश: थैमान घातले. याच दरम्यान, जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळख्यात घेतले आणि त्यांची झुंज अपयशी ठरली. या शहीद पोलिसांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस दलाकडून कर्तव्यावर असताना मृत्यू होणाऱ्या शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा लाखांची विमा रक्कमही दिली जाते. 

प्रत्येकी 60 लाख रुपयांचे धनादेश

त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे शहीद झालेले पोलीस हवालदार दिलीप भास्कर घुले, भाऊसाहेब एकनाथ माळी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 60 लाख रुपयांचे धनादेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच साहेबराव झिपरू खरे यांच्याही वारसांना लवकरच 60 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी तीनही शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

हेही वाचा > महत्वाची बातमी : दहावी, बारावी निकालाबाबत अनिश्‍चितता कायम!

आपल्या जीवाची बाजू लावून कर्तव्य बजाविताना नाशिक ग्रामीण पोलिस दलातील तिघांना वीरमरण आले. या पोलिसांचा पोलीस दलास सार्थ अभिमान आहे. त्यांचा आदर्श नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सदैव स्मरणात राहील. - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण. 

हेही वाचा > लुटालुट थांबणार तरी कधी?...बियाण्यांचा दर तिप्पट...शेतकरी हतबल!

loading image
go to top