esakal | RTE प्रवेश प्रक्रियेस लॉकडाउनचा अडथळा; प्रवेशाबाबत देणार पोर्टलवर सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

rte

RTE प्रवेश प्रक्रियेस लॉकडाउनचा अडथळा; प्रवेशाबाबत देणार पोर्टलवर सूचना

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे (corona virus) शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) (education right) आर्थिक दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये (private schools) २५ टक्‍के राखीव जागांच्‍या प्रवेशाची प्रक्रियाही रखडली आहे. लॉकडाउननंतर (lockdown) प्रवेशाबाबत पोर्टलवर (portal) सूचना दिली जाईल. पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने (education department) जारी केली आहे.

परिस्‍थिती सुरळीत झाल्‍यानंतर प्रक्रिया होणार सुरू

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेलाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्‍यानंतर गेल्‍या ७ एप्रिलला प्रवेशासाठी सोडत काढण्यात आली. सलग शासकीय सुट्या आल्‍याने १५ एप्रिलपासून पालकांना एसएमएस प्राप्त होण्यास सुरवात होईल, असेही कळविले होते. परंतु, याचदरम्यान राज्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्‍याने गत वर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया रेंगाळली आहे. पालकांकडून वारंवार चौकशी होत असल्‍याने शिक्षण विभागाने सूचना जारी केली आहे. त्‍यानुसार लॉकडाऊउननंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाणार आहे. सद्यःपरिस्‍थिती लक्षात घेता पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही केले आहे.

हेही वाचा: नाशिकमधील ‘त्या’ भुयारी मार्गाचे गूढ कायम; पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज

सव्वादोन लाख पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष

राज्‍यातील नऊ हजार ४३२ शाळांनी या प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. त्‍यानुसार प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍याने राज्‍यभरातून दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले होते, तर सोडतीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली होती. नाशिक जिल्ह्यात साडेचारशे शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी चार हजार ५४४ जागा उपलब्‍ध आहेत. १३ हजार ३३० अर्ज प्राप्त झाले असून, चार हजार २०८ विद्यार्थ्यांची नावे सोडतीत निवडली आहेत.

हेही वाचा: लॉकडाऊनमुळे जिम व्यवसायिकांची आर्थिक कोंडी; सलंग्न व्यवसायावरही परिणाम