Nashik Fire Accident: सिन्नर- शिर्डी महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

Truck caught Fire
Truck caught Fireesakal

Nashik Fire Accident : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात जालन्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने पेट घेतल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

शॉर्टसर्किट होऊन वायरिंग पेटून धूर निघू लागतात चालक व त्याच्या सहकाऱ्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून खाली उड्या मारल्याने जीवित हानी टळली. (running truck caught fire on Sinner Shirdi highway Nashik Fire Accident)

जालना येथून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो क्र . एमएच 04 /LE 9514 पाथरे येथील महावितरण कार्यालयाच्या समोरून जात असताना वायरिंग पेटून चालकाच्या केबिनला आग लागली.

चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला व जीव वाचवण्यासाठी केबिनमधील दोघांनी उड्या मारल्या. स्थानिक रहिवाशांनी तसेच महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Truck caught Fire
Fire Accident : स्वयंपाक बेतला जिवावर, सोलापूरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

मात्र जोराचा वारा वाहत असल्याने आगी भडकून संपूर्ण केबिन पेटली होती. वावी पोलीस ठाण्यातून कळवण्यात आल्यावर पिंपरवाडी येथील टोल नाक्यावरील मदत पथक, पाण्याचा टँकर अपघातस्थळी पोहोचले.

पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र ट्रक ची संपूर्ण केबिन जळून खाक झाली होती. सुदैवाने ट्रक रिकामा धावत होता. त्यामुळे आग वेळीच विझली.

Truck caught Fire
Navle Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com