''चूलाना धूर परवडना पण...'' गॅस दरवाढीने महिलांचे बजेट कोलमडले

chul
chulesakal

खामखेडा (जि. नाशिक) : शासनाने उज्ज्वला गॅस मोफत देऊन चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून आमची सुटका केली. पण, आता गॅसचे दर वाढवून सरकारने शंभर रुपयांत दिलेल्या गॅसची कसर काढून घेतली आहे. रोजंदारी करून गॅस भरणे आता परवडत नाही. त्यामुळे ‘चुलीवरना धूर परवडना पण, गॅसनी टाकी नको भाऊ’ हे शब्द आहेत ग्रामीण भागातील मजुरी करणाऱ्या महिलांचे. गॅस दरवाढीने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

अस्मानी संकटांमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. कोरोनामुळे सामान्यांना नोकरीला देखील मुकावे लागले. तर अनेकांचे जीवन या महामारीने उद्‌ध्वस्त झाले आहे. एकूणच शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. एकीकडे समोर आर्थिक अडचणी असताना दुसरीकडे महागाईचा भस्मासूर वाढत आहे. इंधन आणि घरगुती गॅसच्या दरात झालेल्या भाववाढीमुळे ग्रामीण भागातील महिलांवर आर्थिक ताण आला आहे. शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेतून जवळजवळ सर्वच मजुरी करणाऱ्या कुटुंबाच्या घरात गॅस पोहचला आहे. सुरवातीला मोठ्या उत्साहात गॅस सिलिंडर घेतले जात असत. मात्र, या कुटुंबांना सध्या सिलिंडर घेणे जड जात आहे.

chul
नाशिक : पाणी टंचाईला बारभाई कारभार जबाबदार

तीन- चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील ९० टक्के कुटुंबे जळाऊ लाकडाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करायची. परंतु, उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने शंभर रुपयांत सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांकडे आता ९० टक्के गॅस सिलिंडर आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसचा दर प्रत्येक महिन्याला वाढत असून, यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट’ कोलमडत आहे.

सुरवातीला गॅसवर सबसिडी मिळायची. दरवाढ झाल्यानंतर आता सबसिडी मिळत नाही. ग्रामीण भागातील उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व इतर गॅसधारक स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गेल्या सात वर्षात ४१० रुपयांवरून घरगुती गॅसचा दर ९४९ रुपयांवर पोहोचला आहे. रोजंदारी करून गॅस भरणे आम्हाला परवडत नाही. त्यापेक्षा फुकटात मिळालेले सरपण आणून चूल पेटवणे सोपे आहे. मजुरी करणाऱ्या कुटुंबाला एक हजार रूपये गॅससाठी व दररोज पेट्रोलसाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने ‘चूलाना धूर परवडना पण, गॅस ना नको’ अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

chul
आधी मीडिया पोहोचते नंतर पोलीस; महसूल मंत्री थोरात यांचा घरचा आहेर

''सुरवातीला आम्हाला गॅस भरून घ्यायला परवडत होता. मोफत गॅस मिळाला म्हणून आम्ही खुश होतो. मात्र, गॅसची किमत एवढी वाढली की, आम्हाला रोजंदारीवर जाऊन गॅस भरणे महाग पडू लागले आहे. त्यामुळे गॅस बंद करून आम्ही चूल पेटविली आहे.'' - लताबाई पवार, शेतमजूर, खामखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com