esakal | 8 दिवसापूर्वीच कर्तव्यावर रूजू झाला, अन् नियतीने जवान हिरावला
sakal

बोलून बातमी शोधा

jawan sachin gayakwad

8 दिवसापूर्वीच कर्तव्यावर रूजू झाला, पण नियतीने जवान हिरावला

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सतीश गायकवाड- सकाळ वृत्तसेवा

धुळगाव (जि.नाशिक) : जवान सचिन गायकवाड हे लष्काराच्या पुणे येथील युनिट-120 इंजिनिअर रेजिमेंट, सीएमई मध्ये कार्यरत होते. पंधरा दिवसांच्या सुटीनंतर आठ दिवसांपूर्वीच ते परतले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अचानक होत्याचे नव्हते झाले अन् देशसेवेचे स्वप्न कायमचे भंगले...

आई का रडते? चिमुकले बोल ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

सचिन यांच्यामागे पत्नी सोनाली, वडील भीमराज, आई मीराबाई, भाऊ विजय आणि दोन मुली असा परिवार आहे. आराध्या (२) व संस्कृती (४) अशा दोन मुली सचिन गायकवाड यांना आहेत. जवान सचिन गायकवाड हे लष्काराच्या पुणे येथील युनिट-120 इंजिनिअर रेजिमेंट, सीएमई मध्ये कार्यरत होते. पंधरा दिवसांच्या सुटीनंतर आठ दिवसांपूर्वीच ते परतले होतेपुणे येथे कर्तव्यावर असताना जागेवरच कोसळल्याने सचिन यांना आठ दिवसापूर्वीच लष्काराच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्यात कालच (ता.३) त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. पुणे येथून आज सकाळी नऊला खास वाहनाने त्यांचे पार्थिव पुणे येथून दुपारी दोनला धुळगाव येथे आणण्यात आले. सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी तीनला लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ विजयने अग्निडाग दिला. अंत्यसंस्कारावेळी आई का रडते म्हणून त्या निरागसपणे विचारत होत्या. त्यांचे हे चिमुकले बोल ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

हेही वाचा: गडकरींना भावलं नाशिक! नाशिकमध्ये 'जे' आहे ते नागपुरलाही नाही

संपूर्ण गावात रांगोळी

पुणे येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले येथील जवान सचिन गायकवाड यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. आज दुपारी लष्करी इतमामात त्यांना हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. . सैनिक रेजिमेंटचे राजेंदर सिंग, तहसीलदार प्रमोद हिले, निफाड तालुका माजी सैनिक महासंघाचे अध्यक्ष खरात, शहीद संघाचे नवनाथ पगार, येवला तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष धनवटे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली. तालुक्यातील आजी माजी सैनिक गणवेशात उपस्थित होते. गावातील महिलांनी संपूर्ण गावात रांगोळी काढली होती.

हेही वाचा: संधी हुकलेल्‍यांसाठी शनिवारी, रविवारी एमएचटी-सीईटी परीक्षा

मोफत मास्क व सॅनिटाजेशन

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक असल्याने धुळगावचे सरपंच योगेश गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांनी गावात मोफत मास्क वाटप करीत सॅनिटाजेशन केले. अंत्यसंस्काराचा रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविले. स्मशानभूमित स्वच्छता केली. संपूर्ण गाव पंचक्रोशीतून नागरिक अंत्यसंस्कारास उपस्थित होते.

loading image
go to top