म्हणतात ना...देव तारी त्याला कोण मारी...

Sadhu survived under the running train Nashik News
Sadhu survived under the running train Nashik News esakal

मनमाड (जि. नाशिक) : रुळावरून धडतधत जाणारी रेल्वे (Railway) आणि फलाटावर झालेला एकच आरडाओरडा, सर्वांच्या नजरा रेल्वेच्या रुळाकडे लागल्या होत्या आणि धडधडणाऱ्या रेल्वेखाली आपला जीव मुठीत घेऊन आपले ‘मरण पाहिले म्या डोळा’ असा साक्षात आपला मृत्यू डोळ्याने पाहत वृद्ध साधू दैव बलवत्तर म्हणून सहीसलामत मृत्यूच्या दाढेतून वाचला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच प्रसंग मनमाडच्या रेल्वे स्थानकावर घडला. साक्षात धडधडणारा मृत्यू फलाटावरील प्रवाशांनी आणि वृद्ध साधूनेही पाहिला. फलाट तीनवर ही घटना घडली. एका वृद्ध साधूला वाराणसीला (Varanasi) जायचे होते. गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या साधूच्या कानावर फलाटावरील घोषणा पडली. विशेष म्हणजे या मार्गाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्या या फलाट एक किंवा दोनवर येत असतात. परंतु साधूला याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते फलाट तीनवर उभे होते. गाडी फलाट (Platform) दोनवर येणार असल्याची ती घोषणा होती. आपण फलाट चुकलो असल्याची चूक साधूच्या लक्षात आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फलाटावरून खाली उतरून लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भुसावळकडून येणारी आणि मुंबईला जाणारी हैदराबाद-मुंबई-साकेत एक्स्प्रेस फलाटावर येत होती.

Sadhu survived under the running train Nashik News
नाशिक : कोकणचा राजा 'हापूस' लासलगावमार्गे अमेरिकेला रवाना

गाडी जवळ आली होती. समोर गाडी पाहून साधू गोंधळले. मात्र त्याच क्षणी कुठलाही विचार न करता त्यांनी लोहमार्गावर झोपून घेतले. साधू काय करतात म्हणून फलाटावरील माणसे पाहत होती. मात्र वेळ नव्हता. गाडी धडधड करत आली आणि साधूच्या अंगावरून जाऊ लागली. परंतु सर्वांना ‘देव तारी त्याला कोण मारी’ हीच प्रचिती आली. गाडी धडधडत जात असताना प्रवाशांनी आरडाओरडा केला. दोन्ही बाजूंच्या फलाटावरील प्रवासी हातवारे करून ओरडत होते. सर्वांचा गोंधळ पाहून गाडीही थांबली. गाडी थांबताच लोहमार्गा मधोमध झोपलेले साधू महाराज अलगद हाताच्या आणि गुडघ्याच्या सहाय्याने बाहेर आले. कुठेही जखम नाही की वरखडा नाही. मृत्यच्या दाढेतून ते सहीसलामत बाहेर आले होते. अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचला. त्यांना सुखरूप पाहून सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Sadhu survived under the running train Nashik News
गाडी खड्ड्यात आदळली... म्हणजे देवळा आलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com