SAKAL Exclusive : 40 टक्के शहर ‘CCTV’च्या नजरेत कैद; मोहीम पूर्णत्वाच्या टप्प्यावर

CCTV
CCTVesakal
Updated on

नाशिक : संपूर्ण शहराला नजरेच्या टप्प्यात आणणाऱ्या स्मार्टसिटी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोचत असून, शहरात १५९ ठिकाणी ३१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया पूर्ण पार पडली आहे. मार्च अखेरपर्यंत आठशे सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरात बसविले जाणार असून, महापालिकेच्या मागणीनुसार कॅमेऱ्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. (SAKAL Exclusive 40 percent of city caught in CCTV NMC campaign at completion stage Nashik News)

CCTV
SAKAL Exclusive : डझनभर ठेकेदारांच्या भरवशावर अडीच हजार कोटींच्या योजना

संपूर्ण शहर नजरेच्या एका टप्प्यात आणण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने आयटी प्रकल्प अंतर्गत शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूददेखील करण्यात आली. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व स्मार्टसिटी कंपन्यांमध्ये बसविल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाआयटी कंपनीमार्फत करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी राज्यात एकच निविदा प्रक्रिया राबविण्यात आले. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर होणारा खर्च राज्य शासनाकडे वर्ग करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक स्मार्टसिटी कंपनी माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लागणारा खर्च वर्ग करण्यात आला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम संथगतीने सुरू होते. स्मार्टसिटी कंपनीची मुदत पुढील वर्षी संपुष्टात येत असल्याने त्या अनुषंगाने केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने स्मार्टसिटी कंपनीमार्फत असलेली कामे नव्या न घेता सध्या सुरू असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मार्च २०२३ अखेरपर्यंत मुदत निश्चित केली.

त्या अनुषंगाने शहरात स्मार्टसिटी कंपनीअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला गती मिळाली आहे. शहरात ३७१ ठिकाणी ७१२ फिक्स बॉक्स कॅमेरे, तर ८८ पॉइंट टील्ट झूम कॅमेरे बसविले जाणार आहे. यातील १५९ ठिकाणी २७८ फिक्स बॉक्स कॅमेरे, तर ३४ ठिकाणी पॉइंट टील झूम कॅमेरे बसविण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत संपूर्ण शहरात ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नजरेच्या टप्प्यात आणले जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.

CCTV
SAKAL Exclusive : रस्ते देखभाल प्राधिकरण निद्रिस्त; नाशिक अपघातात राज्यात पहिल्या स्थानी

शहर येणार नजरेच्या टप्प्यात

शहरात सध्या ८०० पैकी २७४ सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेच्या सेवा नियंत्रित करणार आहे तर ५२६ सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा नियंत्रित करणार आहे. जवळपास चाळीस टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

कमांड कंट्रोल सेंटरमधून नियंत्रण

३७१ ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवली जाणार असून, त्या सर्व कॅमेऱ्याचे नियंत्रण दोन कमांड कंट्रोल सेंटर येथून होणार आहे. ५२६ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कमांड कंट्रोल सेंटर पोलिस आयुक्तालयात तर महापालिकेच्या सेवा नियंत्रित करणाऱ्या २७४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण पंचवटी विभागातील स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यालयात तयार करण्यात आलेल्या कमांड कंट्रोल सेंटरमधून होणार आहे. दोन्ही कमांड कंट्रोल सेंटरमध्ये प्रत्येकी आठ स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

CCTV
Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम

शहरात महत्त्वाचे घटना घडल्यास किंवा सूचना देण्यासाठी पूर्वी भोंगे वाजवले जात होते. आता पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम (पीएएस) च्या माध्यमातून नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहे. शहरात वीस ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम बसली जाणार असून, त्यातील १४ ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. पुराची माहिती देणारे वीस फ्लड सेन्सर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाची पातळी मोजणारे २६ एनव्हायरमेंट सेंसर शहरात वसुली जाणार असून, त्यापैकी १४ ठिकाणी सेंसर बसविण्यात आले आहे.

कचऱ्याच्या ब्लॅकस्पॉटवर देखरेख

शहरात कचऱ्याचे ब्लॅकस्पॉट वाढत असल्याने महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या सर्वेक्षणातून चाळीस ब्लॅकस्पॉटवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून

- शहरात ३७१ ठिकाणी ८०० सीसीटीव्ही कॅमेरे.
- ७१२ फिक्स बॉक्स कॅमेरे.
- ८८ ठिकाणी पॉइंट टील्ट झूम कॅमेरे.
- १५९ ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण.
- २७८ ठिकाणी फिक्स बॉक्स कॅमेरे बसविले.
- ३४ ठिकाणी पॉइंट टिल्ट झूम कॅमेरे बसविले.

CCTV
Nashik : वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर बेजार; मद्याची दुकाने ठरतात अडथळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com