SAKAL Exclusive : परदेशातील विद्यार्थ्यांना मुक्‍त, दूरस्‍थ शिक्षणाचे दार बंद! UGCकडून विद्यापीठांना पत्र

distance learning for foreign students now stopped from UGC
distance learning for foreign students now stopped from UGCesakal

नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण क्षेत्राची व्‍याप्ती वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र दुसरीकडे परदेशातील विद्यार्थ्यांना मुक्‍त व दूरस्‍थ पद्धतीच्‍या शिक्षणासाठी दार बंद असणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्‍याकडून विद्यापीठाच्‍या कुलसचिवांना याबाबत पत्र पाठविले आहे.

नियमांच्‍या या अडथळ्यांमुळे राज्‍यस्‍तरीय यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्‍य काही विद्यापीठांना परदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नकार द्यावा लागणार आहे. (SAKAL Exclusive distance learning for foreign students now stopped Letter from UGC to Universities nashik news)

विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या डिस्‍टन्‍स एज्‍युकेशन ब्यूरो या विभागाने देशभरातील विद्यापीठाच्‍या कुलसचिवांना पत्र पाठविले आहे. गेल्‍या डिसेंबरमध्ये पाठविलेल्‍या या पत्रानुसार परदेशी विद्यार्थ्यांना मुक्‍त व दूरस्‍थ शिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश देऊ नये, असे नमूद केले आहे.

मुक्‍त व दूरस्‍थ शिक्षण (ओपन ॲन्ड डिस्‍टन्‍स लर्निंग) शिक्षणक्रमांबाबत यूजीसी नियमावली, २०२० चा संदर्भ देण्यात आला आहे. यूजीसी नियमावलीत ४ सप्‍टेंबर २०२० व त्‍यानंतर १ जुलै २०२१ आणि १८ जुलै २०२२ अशा वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्‍या असून, यामुळे परदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मज्‍जाव करण्यात आला आहे.

distance learning for foreign students now stopped from UGC
Fire Accident : वर्षभरात शहरात 404 आगीच्या घटना; खोडसाळपणा म्हणून केलेल्या 9 खोट्या घटना

...तर प्रयत्‍न अयशस्‍वी

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचविली जात आहे. स्‍थानिक विद्यार्थ्यांसोबत परदेशातील विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातून शिक्षण दिले जावे, असा विचार काही कालावधीपूर्वी पुढे आला होता.

विद्यापीठ प्रांगणात असलेल्‍या इमारतीत अशा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्‍हणून वापरले जाऊ शकते, असेही मत मांडले गेले. दुसरीकडे पारंपरिक विद्यापीठ असलेल्‍या पुणे विद्यापीठातर्फे दूरस्‍थ शिक्षणासाठी स्‍वतंत्र विभाग कार्यान्‍वित केलेला आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

distance learning for foreign students now stopped from UGC
Nashik News: वीजनिर्मितीत MVP होणार स्‍वयंपूर्ण; Solar Park किंवा शाखानिहाय सौरऊर्जा प्रकल्‍पाची चाचपणी

इतक्‍या व्‍यापक स्‍तरावर प्रयत्‍न सुरू असताना, परदेशातील विद्यार्थ्यांना या शाखेतून शिक्षणाची दारे बंद झाल्‍याने हे प्रयत्‍न अयशस्‍वी ठरत असल्‍याची भावना व्‍यक्‍त केली जात आहे.

...तर विद्यार्थ्यांना व्हिसा नाही

केंद्रीय गृहखात्‍याने स्‍पष्ट केल्‍यानुसार मुक्‍त विद्यापीठ, त्‍यांचे उपकेंद्र किंवा ऑफ कॅम्‍पस सेंटरमध्ये तसेच दूरस्‍थ शिक्षण देणाऱ्या संस्‍थांमध्ये प्रवेशित असलेल्‍या विद्यार्थ्यांना ‘स्‍टुडंट व्हिसा’ दिला जाणार नाही, असे स्‍पष्ट केलेले आहे. त्‍यामुळे अशा विद्यार्थ्यांना व्हिसा मिळविण्यात अडथळा येऊ शकतो.

distance learning for foreign students now stopped from UGC
Nashik News : पाथर्डीत थकबाकीदारांच्या नळजोडणी तोडण्यास प्रारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com