SAKAL Exclusive : महामार्गावर प्रवासी निवारागृहांची वानवा! विद्यार्थी, प्रवासी तळपत्या उन्हात उभे

Common commuters including school students standing in the sun on the highway for lack of shelter sheds.
Common commuters including school students standing in the sun on the highway for lack of shelter sheds.esakal

SAKAL Exclusive : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई आग्रा महामार्गाची ओळख आहे. जुन्या चौपदरीकरण व नव्याने झालेल्या सहापदरीकरणाने इगतपुरी ते नाशिक दरम्यानची रहदारी सुरळीत झाली असली तरी रुंदीकरण करताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवाशांना उभे राहणे अथवा वयोवृध्दांसह शाळकरी मुलामुलींसाठी आवश्यक पीकअप शेड वेळोवेळी मागणी करूनही उभारलेले नाहीत.

त्यामुळे गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी व प्रवाशांना उन्हापावसातच थांबावे लागते. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने त्यात भर पडली आहे. (SAKAL Exclusive number of passenger shelters on highway Neglect of toll administration and National Highway Authority nashik news)


महामार्गावर अनेक ठिकाणी पीकअपशेडची आवश्‍यकता आहे. त्यात रायगडनगर, वाडीवऱ्हे, मुकणे फाटा, पाडळी देशमुख, मुंढेगाव, माणिकखांब, खंबाळे, कावनई फाटा, सिन्नर चौफुली, घोटी, टाकेघोटी, बोरटेंभे, नांदगाव फाटा, पिंपरीफाटा, तळेगाव या ठिकाणी आजमितीस पिकअप शेड होणे अत्यंत आवश्यक आहे.

भुयारी मार्गाकडेही दुर्लक्षच

चौपदरीकरणाच्या कामात भुयारी मार्ग तसेच इतर सुविधांत अनेक त्रुटी ठेवल्याने अडथळे येत आहेत. भुयारी मार्ग तर ठेवले पण तिथे गाड्या जायला रस्ताच बनवला नसल्याने भुयारी मार्गाचा उपयोग नेमका कशासाठी असा प्रश्न आहे.

चौपदरीकरण करताना अनेक ठिकाणी गरज असताना दुभाजकात खंड न ठेवल्याने गाड्यांना मोठा वळसा घ्यावा लागतो.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Common commuters including school students standing in the sun on the highway for lack of shelter sheds.
Nashik Kumbh Mela: नाशिकच्या कुंभमेळ्यात प्रयागराज, वाराणसी पॅटर्न! NMC अधिकाऱ्यांची सिंहस्थस्थळी भेट

नाशिकहून येताना रायगडनगर किंवा वाडीवऱ्हे येथे गावाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग असूनही तेथे जाण्यासाठी रस्ताच बनवला नसल्यानेही खंडीत दुभाजकापर्यंत जाऊन वळसा घेत जावे लागत असल्याने अपघात वाढले असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत आहेत.

टोल प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे येथील भुयारीमार्ग मार्गातील त्रुटीबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही टोल प्रशासन किंवा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने गांभीर्याने घेतलेले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

यावर तोडगाही निघत नसून भुयारी मार्गांचा वापर केवळ जनावरांना होत असल्याने भुयारीमार्ग हे ‘असून अडचण नसून खोळंबा’ झाले आहेत. येथील भुयारीमार्ग वाहन धारकांनाही उपयोगात यावे, यासाठी रस्त्याची योग्य ती दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

Common commuters including school students standing in the sun on the highway for lack of shelter sheds.
Saptashrungi Temple Restoration: आदिमायेच्या मंदिराचा होणार जिर्णोद्धार; अक्षय तृतीयेपासून होणार शुभारंभ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com