SAKAL IMPACT : दीड वर्षांची समस्या सुटल्याने नागरिकांना सोडला सुटकेचा सुस्कारा!

Nashik News : वासननगर येथील सर्वे क्रमांक ९११ भागातील दीड वर्षापासून सुरू असलेल्या पाणी गळती बाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनपाचा पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये आला.
Sudam Demse and Nana Gaikwad present during the repair work
Sudam Demse and Nana Gaikwad present during the repair workesakal

वासननगर : वासननगर येथील सर्वे क्रमांक ९११ भागातील दीड वर्षापासून सुरू असलेल्या पाणी गळती बाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनपाचा पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये आला. माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या पुढाकाराने उपअभियंता गोकुळ पगारे, नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना ही गळती शोधण्यात यश आले असून सायंकाळपर्यंत ही दुरुस्ती करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (SAKAL IMPACT Citizens wasan nagar water problem)

येथील साईराज रो- हाऊसेस समोरच्या साडेसात मीटर रस्त्यावर ही गळती सुरू होती. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनदेखील दखल घेण्यात आली नव्हती. वैतागलेल्या नागरिकांनी तक्रार करणेदेखील बंद केले होते. त्यात सध्या येथे डांबरीकरण सुरू झाल्याने ही गळती अशीच राहिली, तर चांगला झालेला रस्ता भविष्यात फोडावा लागेल या चिंतेत नागरिक होते.

या अनुषंगाने आजच्या ‘सकाळ’ मध्ये तब्बल दीड वर्षांपासून पाणी गळती या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर माजी नगरसेवक डेमसे यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी स्वतः बोलत पाठपुरावा सुरू केला. सकाळी दहा वाजताच महापालिकेतर्फे कार्यवाहीला सुरवात करण्यात आली.  (latest marathi news)

Sudam Demse and Nana Gaikwad present during the repair work
Nashik Summer Heat Waves : नांदगाव तालुक्यात उष्माघाताची लाट? आवश्‍यक काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

डेमसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथे येऊन पाहणी करत तातडीने कामाला सुरवात केली. या ठिकाणी पंक्चर असलेला नादुरुस्त पाइप बदलण्यात आला असून ही समस्या दूर करण्यात आली. दीड वर्षांची समस्या सुटल्याने नागरिकांनी संबंधितांसह ‘सकाळ’चे विशेष आभार मानले आहे.

Sudam Demse and Nana Gaikwad present during the repair work
Nashik News : मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया! 2 दिवसानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com