SAKAL Impact : राजीवनगरला चेंबर दुरुस्तीला सुरवात

‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी (ता.६) मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आणि येथील चेंबर दुरुस्तीला सुरवात करण्यात आली.
Drainage cleaning work started
Drainage cleaning work started esakal

इंदिरानगर : सोमवारी (ता.५) राजीवनगर वसाहतीमधील अंतर्गत अरुंद गल्लीमध्ये वाहणाऱ्या ड्रेनेज पाण्याची समस्या ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी (ता.६) मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आणि येथील चेंबर दुरुस्तीला सुरवात करण्यात आली.

खासदार हेमंत गोडसे यांच्या विकास निधीतून या गल्लीमध्ये काँक्रिटीकरण सुरू आहे. (SAKAL Impact Rajiv Nagar chamber repair started nashik news)

Drainage cleaning work started
SAKAL Impact : विंध्यवासिनी मंदिर परिसर, ‘टी पॉइंट’वर डांबरीकरण

मात्र स्वखर्चाने बांधलेल्या स्वच्छतागृहातील पाणी रस्त्यावर वाहण्यास सुरवात झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबतीत माजी नगरसेवक अमोल जाधव आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

‘सकाळ’ ने ‘दुर्गंधीयुक्त पाण्याने राजीवनगरचे रहिवासी हैराण’ या शीर्षकाखाली ही समस्या मांडली होती. सकाळी दहाच्या सुमारास मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथे भेट देऊन तत्काळ तुंबलेले चेंबर मोकळे करण्यास सुरवात केली.

मात्र या काँक्रिटीकरण दरम्यान दोन्ही बाजूला सोडलेल्या जागेत कायमस्वरूपी ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून कायमस्वरूपी ही समस्या सोडविण्याची मागणी जाधव यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.

Drainage cleaning work started
SAKAL Impact: मालेगाव वीजचोरीच्या समूळ उच्चाटनासाठी स्वतंत्र पथक! गृह मंत्रालयाची दखल; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com