Sakal Investigative Story : महामार्गांवर ‘अग्निशमन’चे केंद्रच नाहीत!; केवळ NMCच्या बंबांचाच आधार

Accident News
Accident Newsesakal

नाशिक : नाशिक शहर हद्दीतून तीन महामार्ग जातात. दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद रोडवरील अपघातात ट्रॅव्हल्स पेटल्याने १३ प्रवाशांचा बळी गेला तर, गुरुवारी (ता. ८) पळसे चौफुलीवर महामंडळाची बस अपघातात दोन दुचाकीस्वाराचा आगीत होरपळून जीव गेला. त्यामुळे या तीनही मार्गावर शहर हद्दीपासून किमान १० ते १५ कि.मी. अंतरावर सुसज्ज अग्निशमन केंद्र असणे गरजेचे असताना, याबाबत जिल्हा प्रशासनाची उदासिनताच समोर आली आहे.

अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेले असतानाही कोणत्याही स्वरुपाचे उपाय या तीनही महामार्गावर करण्यात आलेले नाहीत. औरंगाबाद, पुणे आणि मुंबई-आग्रा या तीनही महामार्गांवर शहर हद्दीबाहेर अग्निशमन दलाचे केंद्र आवश्यक असताना त्याकडे होत असलेले जिल्हा प्रशासनाचे दूर्लक्ष आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. (Sakal Investigative Story no fire stations on highways Only support of NMC fire stations Nashik news)

औरंगाबाद रोडवरील मिरची चौफुली येथे गेल्या ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास भरधाव वेगातील खासगी ट्रॅव्हल्स बसने चौफुली ओलांडणार्या आयशर ट्रकला धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतला आणि १२ प्रवाशांचा या आगीत होरपळून बळी गेला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. याच घटनेची गुरुवारी (ता. ८) पुना रोडवरील पळसेगाव चौफुलीवर पुनर्रावृत्ती झाली. ब्रेकफेल झालेल्या राजगुरुनगर बसने तीन दुचाक्यांना धडक देत पुढच्या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील दोघेजण बसखाली सापडले. त्याचवेळी बसने पेट घेतला आणि दोघांचा होरपळून मृत्यु झाला.

या दोन्‌ही घटनांमध्ये भीषण अपघात होऊन वाहनांनी पेट घेतला. ही वाहने आगीच्या लोटात खाक होईपर्यंत अग्निशमन दलाचे बंब पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे येत्या काळात या तीनही महामार्गांवर शहरापासून किमान १० ते १५ किमी अंतरावर अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. ते नसल्याने सारी भिस्त नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलावरच अवलंबून आहे.

Accident News
Nashik Crime News : जानोरी शिवारातील गोदामावर छापा; 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

तीनही महामार्गावर अग्निशमन केंद्र नाही

* मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका येथे अग्निशमनचा बंब असून, त्यानंतर ३६ कि.मी.नंतर नाशिकच्या अंबड एमआयडीसीत अग्निशमन केंद्र आहे. त्यानंतर महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोलनाका येथेही अग्निशमन बंब नाही. पिंपळगाव बसवंत शहरात बंब आहे.

* नाशिक-औरंगाबाद रोड शहर हद्दीबाहेर एकही अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे या रोडवर कोणतीही आपत्कालिन परिस्थिती वा अपघात घडल्यास पंचवटीतील आडगाव आणि पंचवटीतील दोन अग्निशमन केंद्रातून मदत पोहोच होते.

* नाशिक-पुणा महामार्गावरील शिंदे गाव टोलनाका येथेही अग्निशमन केंद्र वा बंब नाही. त्यामुळे सिन्नर घाटापर्यंत अपघात झाल्यास नाशिकमधून वा सिन्नरमधून अग्निशमन दलाचे बंब मदत कार्यासाठी येतात.

शहर व लगतचे अग्निशमन केंद्र

नाशिक महापालिकेंतर्गत पंचवटी -१, पंचवटी -२ (महामार्गावरील केंद्र), सिडको, सातपूर, नाशिकरोड, शिंगाडा तलाव येथे अग्निशमन केंद्र असून, याशिवाय अंबड एमआयडीसी, नाशिक रोड नोटप्रेस, महिंद्र ॲण्ड महिंद्रा कंपनी (सातपूर), एकलहरा औष्णिक केंद्र, घोटी टोल प्लाझा.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Accident News
Gyandip Gurukul Crime Case : अत्याचार प्रकरणातील मोरेला पुन्हा पोलिस कोठडी; 7 स्वतंत्र गुन्हे दाखल

समृद्धीवर अग्निशमन केंद्र

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर प्रत्येक ४० कि.मी. अंतरावर एक सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे या दरम्यान कोणतीही दूर्घटना घडल्यास अग्निशमनचा बंब व जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचणे शक्य होणार आहे.

उपाययोजनांकडे दूर्लक्ष

अपघाती घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून मिरची चौफुली वगळता अन्य चौफुल्यांवर ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी अजूनही बेजबाबदारपणे उभारलेले गतीरोधक आहे तसेच आहेत. सूचना फलकांचा अभाव आहे. सिग्नल यंत्रणा रस्त्याच्या एकाच दिशेला आहेत.

"महापालिका हद्द संपल्यानंतर तीन महामार्गावर पुढच्या १५ कि.मी. अंतरावर अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे दूर्घटना घडल्यास मदत वेळेत उपलब्ध होणे शक्य होते. शहरातील केंद्रातून मदत पोहोच होते परंतु वाहतूकीच्या समस्येमुळे विलंब होण्याची शक्यता अधिक असते." - संजय बैरागी, अग्निशमन दलाचे प्रमुख, नाशिक मनपा.

Accident News
Nashik Accident News : सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com