SAKAL Special : चालता... बोलता...! ‘सर्वात भारी इगतपुरी’

SAKAL Special : सध्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद करंडक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी (एमपीए) येथे सुरू आहे.
A superhit Igatpuri T-shirt and slogan.
A superhit Igatpuri T-shirt and slogan.esakal

‘सर्वात भारी इगतपुरी’

सध्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद करंडक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी (एमपीए) येथे सुरू आहे. यात विविध वैयक्तिक आणि सामूहिक क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. तालुकास्तरावर विजयी झालेले संघ आणि खेळाडू येथे सहभागी झाले आहेत.

त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात जणू ही स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक तालुक्याला टी-शर्टसाठी रंगही ठरवून देण्यात आले आहेत. अधिकारीच यात सक्रियपणे सहभागी झाल्याने रंगत वाढली आहे. त्यात सध्या इगतपुरी तालुक्याचा टी-शर्ट आणि त्यावर लिहिलेले घोषवाक्य स्पर्धेत कमालीचे हिट ठरत आहे.

इगतपुरी तालुक्याच्या संघातील एखादा खेळाडू अथवा संघ जिंकला, तर उपस्थित सर्वच खेळाडू आणि अधिकारी विशेषतः गटशिक्षणाधिकारी एक सुरात ‘सर्वात भारी इगतपुरी’ असा जयघोष करत आहेत.

हेच घोषवाक्य इगतपुरीच्या सर्व खेळाडूंच्या टी-शर्टवर रंगवण्यात आले आहे. सर्वसाधारण विजेतेपद मिळवून खरोखरच हा इगतपुरीचा संघ वरचढ ठरतो आणि त्यांच्या टी-शर्ट वर लिहिलेले ‘सर्वात भारी इगतपुरी’ हे घोषवाक्य खरे करतो हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

(SAKAL Special chalta bolta Igatpuri is best in allover marathi news)

पाटील जरा पुढं व्‍हा तर..!

मित्राच्‍या ग्रुपसोबत कुठं चहा-नाश्‍ता केला, की हमखास घडणारी गोष्ट म्‍हणजे बिल कुणी भरायचं. असाच एक विनोदी किस्सा चहाच्‍या दुकानात घडला. तीन-चार मित्रांचा गट चांगलाच गप्पांमध्ये रंगला होता. सर्वांनी चहा मागवला. तेवढ्यावर थांबलं तरच नवल, मग खायला काही वस्‍तूंची फर्माईश झाली.

सारं खाऊन-पिऊन झालं तरी गप्पा काही संपेना. कुणीतरी बिल देण्यासाठी पुढं होईल, याचीच प्रतीक्षा करताना गप्पा ताणल्‍या जात होत्‍या. कुणीच पुढाकार घेईना म्‍हटल्‍यावर सर्व एकत्र उठले. बिल भरायला मित्राला पुढे करण्यासाठी युवकाने चांगलीच शक्‍कल लढविली. मानपान देताना ‘पाटील जरा पुढं व्‍हा तर’ म्‍हणत बिल भरण्याचा इशारा दिला अन्‌ उपस्‍थित सर्वांमध्ये हशा‍ पिकला.

प्रतिप्रश्‍न करताना संबंधिताने युवकाला विचारले ‘किती झालं बिल.’ त्‍यावर युवक उत्तरला, ‘झाले असतील पाचशे-सहाशे’, असे म्‍हणताच पुन्‍हा एकदा सर्व हास्‍यडोहात बुडाले अन्‌ पैसे भरत ग्रुपने काढता पाय घेतला.

A superhit Igatpuri T-shirt and slogan.
Sakal Special : चालता...बोलता...! राज ठाकरे नाशिकमध्ये करणार नवनिर्माण...

चमकोची हौसच फिटली...

पोलिस आयुक्त शनिवारी सकाळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर आले होते. एरवी नेहमीच पोलिस आयुक्त असो वा आणखी कोणी, असे चमकोगिरी करणारे हजरच असतात. तसेच, आयुक्त येण्यापूर्वीच असे काही चमकोगिरी करणारे मैदानावर हजर होते. आयुक्त आल्यानंतर या चमकोगिरी करणाऱ्यांनीच त्यांना गराडा घातला. आयुक्तांना या मॉर्निंग वॉकमध्ये जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधायचा होता.

त्यांच्या पोलिसिंगसंदर्भातील समस्या जाणून घ्यायच्या होत्या. परंतु ज्या चमकोगिरांनी त्यांना गराडा घातला, ते त्यांचेच म्हणणे आयुक्तांसमोर मांडत होते. त्यामुळे आयुक्तांना नागरिकांशी संवाद साधताना अडसर येत होता. एवढेच नव्हे, तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही या वेळी छायाचित्रे टिपण्यासाठी धडपड करीत होते.

मात्र, आपले फोटो छापून यावेत, यासाठी चमकोगिरी करणारे सतत पुढे पुढे येत असल्याने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वैतागले. अखेर एकजण थेट म्हणालाच, ‘अहो, तुमचेच फोटो छापायचेत का आम्ही... व्हा ना बाजूला... त्यांना बोलू द्या ना लोकांशी...’ चमकोगिरी करणारे जरा चपापलेच. काहींनी बाजूला जाणे पसंत केले, तर एकाने मैदानावरूनच काढता पाय घेतला.

A superhit Igatpuri T-shirt and slogan.
Sakal Special : चालता... बोलता...! झेडपीत यावे की नाही...

स्पर्धांना काही मजा नाही राव

अधिकारी-कर्मचारी यांच्यात सांघिक भावना वाढावी, एकोपा राहावा या उद्देशाने सर्वच शासकीय कार्यालयांकडून दर वर्षी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी आपल्यातील कला सादर करतात, यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. साधारणतः हिवाळ्यात शासकीय कार्यालये या स्पर्धांचे नियोजन करत असतात. जिल्हा परिषदही याला अपवाद नाही.

त्यांनीही क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, यंदा जिल्हा परिषदेला मैदान नसल्याने त्यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानावर स्पर्धा भरविल्या. मैदान मोठे असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा भरविल्या. तर, झाले असे की या स्पर्धांबाबत मैदानावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये संवाद रंगला. यात एका कर्मचाऱ्याने सांगितले, की स्पर्धा एकाच ठिकाणी झाल्या पाहिजेत.

वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने स्पर्धा खेळल्यासारखे वाटत नाही. त्यावर दुसऱ्या कर्मचाऱ्याने लागलीच सांगितले, की त्यामुळेच यंदाच्या स्पर्धांना काही मजाच येत नाही राव... स्पर्धा एकाच मैदानावर झाल्या पाहिजेत. मात्र, पर्याय नाही. जाऊ दे पुढील वर्षी स्पर्धांचा आनंद घेऊ, असे सांगत दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत रस्त्याला लागले. (latest marathi news)

A superhit Igatpuri T-shirt and slogan.
SAKAL Special : चालता...बोलता...! शिरा अन्‌ लापशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com