Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Sakal Special : चालता...बोलता...! राज ठाकरे नाशिकमध्ये करणार नवनिर्माण...

Sakal Special : यंदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापनदिन मुंबईबाहेर साजरा करणार आहेत.

राज ठाकरे नाशिकमध्ये करणार नवनिर्माण...

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यंदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापनदिन मुंबईबाहेर साजरा करणार आहेत. यासाठी त्यांनी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकची निवड केली आहे.

अशातच मनसे भाजप युतीसोबत जाणार असून त्यांना नाशिक लोकसभेची जागा मिळू शकेल, अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे नाशिक की पक्ष यापैकी कोणाचे नवनिर्माण करणार हे पाहावं लागेल, अशा चर्चा नाशिककरांमध्ये रंगू लागल्या आहेत.

(Raj Thackeray will do Navnirman in Nashik marathi news )

आरती गोदावरीसाठी की निधीसाठी

बराच काळ चाललेल्या तू तू मै मै नंतर गोदातीरी गोदावरी आरतीला प्रारंभ झाला. नाशिककरांनी देखील ही गोदाआरती याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. गोदावरी तर सर्वांचीच आहे. जर देवाची पूजा, आरती कोणीही करू शकतो तर गोदावरीची आरती पुरोहित संघ अन् आरती समितीने केल्यास काय बिघडले.

पण कसयं, यांना आरतीत नाही तर आरतीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीत अधिक भक्ती आहे. आरती दरम्यान ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची चढाओढ उपस्थितांना हा चर्चेचा विषय देऊन गेली.

Raj Thackeray
SAKAL Special : चालता- बोलता! राजकारणात काही घडू शकते

हे साम्राज्य पाहिले का

वर्गमित्र भेटले की त्यांची भाषा कुठल्या थराला जाईल, हे काही सांगता येणार नाही. त्याचे झाले असे की दोन वर्गमित्र एका हॉटेलमध्ये भेटले. त्यातील एक हॉटेलचा मालकच होता. त्यामुळे दुसऱ्याने थेट ‘ये तुक्या’ एक ग्लास पाणी आण असा जोरात आवाज दिला. ते ऐकले वेटरने आणि त्याचे पित्तच खवळले.

थेट आपल्या मालकाला अरेऽऽऽ तुरेच्या भाषेत बोलणारा हा कोण लागून गेला म्हणून त्यानेही थेट बोलणाऱ्याची गच्ची पकडली. काय, बोलला तू, तुला माहिती आहे का ते कोण आहेत0 हे सगळे साम्राज्य त्यांनीच उभे केले आहे. वेटरचा रुद्र अवतार बघून मित्राची पाचावर धारण बसली. आम्ही वर्गमित्र असल्याचे सांगत कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली.

Raj Thackeray
SAKAL Special : चालता... बोलता...! साहेब इतका उशीर...

आंदोलन कराव लागतं की काय

शासकीय काम अन सहा महिने थांब ही म्हण प्रचलीत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये वेळात काम होत नसल्याचा सामान्यांना अनेकदा अनुभव येत असतो. मात्र, राजकीय पदावर काम करत असलेले अन लोकप्रतिनिधींची कामे देखील कार्यालयांमध्ये होत नसल्याचे दिसून आलेले आहे. यातही जिल्हा परिषदेत तर, विचारला नको अशी अवस्था असते.

लोकप्रतिनिधी असल्यावर याची तक्रार त्यांच्याकडे करता येते. मात्र, सध्या प्रशासकीय राजवट असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांनी कोणाकडे तक्रार करायची हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेत फाईली वेळात निघत नसल्याची ओरड सध्या जोरात आहे. मार्च एण्डींग असल्याने कामे उरकण्याची घाई सर्वांकडून सुरू आहे.

मात्र, फाईली निघत नसल्याने हल्ली ठेकेदार त्रस्त आहे. असाच त्रस्त ठेकेदार फाइल काढण्यासाठी फेऱ्या मारून थक्क झाला आहे. संतप्त झालेल्या या राजकीय पदाधिकारी कम ठेकेदाराने सर्व राजकीय दबाव टाकूनही फाइल निघत नसल्याचे बोलून दाखवत एका कर्मचाऱ्यास थेट आंदोलन कराव लागेल की काय अशी व्यथा बोलून दाखवली. ( latest marathi news )

Raj Thackeray
Sakal Special : चालता...बोलता...! मीच आहे हुशार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com