Sakal Special : चालता...बोलता...! राजसाहेब मीडियापासून काहीही लपून राहत नाही

शहरात प्रवेश करताच त्यांनी एका बड्या हॉटेलातील सभागृहात आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

राजसाहेब मीडियापासून काहीही लपून राहत नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी शहरात आले. शहरात प्रवेश करताच त्यांनी एका बड्या हॉटेलातील सभागृहात आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना थांबण्यास मज्जाव करण्यात आला.

बैठकीदरम्यान बाहेर काढले, तर अपमान समजू नका, असे खुद्द राज ठाकरे माध्यम प्रतिनिधींना म्हणाले. त्यांचे हे बोलणं सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले. राजसाहेब त्यांना कितीही बाहेर ठेवलं, तरी मीडियापासून काहीही लपून राहत नाही, अशी चर्चा हॉटेलातील उपस्थितांमध्ये रंगली.

राज ठाकरेंना आलाय वीट...

नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिलेले शहर... याच शहरात पक्षाने अनेक चढउतारदेखील पाहिले. या सर्वांत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या संयम अन् सकारात्मकेने शहरात पक्षाला उभारी देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. मात्र यात एक गोष्ट जी त्यांना वारंवार नाशिकच्या बाबतीत सतावत होती, ती म्हणजे पक्ष कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद.

सततचे गाऱ्हाणे ऐकूण वैतागलेले राज ठाकरे गुरुवारी शहरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बरसलेच. तुमच्या या कुरघोड्या, अंतर्गत वाद बंद करा, नुसते गाऱ्हाणे गात बसता याचा मला अक्षरशः वीट आला आहे. यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करा, असे राज ठाकरे यांना सर्व पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगावेच लागले.

Raj Thackeray
Sakal Special : चालता...बोलता...! गुवाहाटीमध्ये इतिहास घडला!

‘पण, मी मनाने ऐकतो...’

नुकताच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्‍थितीत सत्‍कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमादरम्‍यान सूत्रसंचालकाने ‘मंत्रिमहोदय, आमच्या मागण्या उजव्या कानाने ऐकाव्यात’ असे म्‍हणत मागण्या गांभीर्याने घ्याव्‍या, अशी आपसूक अपेक्षा व्‍यक्‍त केली. मंत्रिमहोदय मनोगत व्‍यक्‍त करायला उठल्‍यावर त्‍यांनी या वाक्‍याची आवर्जून दखल घेतली.

‘उजव्या कानाने ऐकावं, असं मी ऐकलं. पण, मी सर्व बाबी या मनाने ऐकतो’ अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात हास्‍यकल्‍लोळ पाहायला मिळाला. सूत्रसंचालकही या विनोदावर खदखदून हसले. अन् हलक्‍या-फुलक्‍या वातावरणात मंत्रिमहोदयांनी आपले भाषण पूर्ण केल्‍यावर कार्यक्रम आटोपला.

Raj Thackeray
Sakal Special : चालता...बोलता...!

विश्वासू खंडूची एकच चर्चा

मालेगाव मधील रस्ते हरविल्याची तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान चांगलेच चर्चेत आले. त्यांची या तक्रारींची दखल घेऊन रस्त्यांची चौकशी झाली. श्री. द्यानद्यान यांनी त्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषदेत आंदोलन केले. गांधीगिरी मार्गाने होणारे त्यांचे आंदोलन कायमच चर्चेत असते.

झाले असे की, जिल्हा परिषद प्रशासनाकडून एका विभागात झालेल्या अपहार विरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी थेट भरवशाचा साथीदार पाळीव श्वान खंडू यास सोबत घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रोखण्यात आले. येथे सामान्यांना न्याय मिळत नाही तर, पाळीव प्राण्याला काय न्याय मिळेल अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली.

Raj Thackeray
SAKAL Special : चालता...बोलता...! उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष घेतला हाती..

मॅडमला शुगर आहे

काही लोकांनी मधुमेहाचा इतका धसका घेतला आहे की ते गोड पदार्थ खात नाहीत. असेच एक मुख्याध्यापक स्वतःची काळजी घेतात. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांसाठी शाळेतच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात एका शिक्षिकेला शुगर निष्पन्न झाली. त्यांची शुगर बघून मुख्याध्यापकांना तर धक्काच बसला.

त्या दिवसापासून शाळेत कोणीही काही आणले की सर लगेच संबंधित व्यक्तीला सांगतात, ‘मॅडमला शुगर आहे. त्यांना देवू नका’ सततच्या या नकारामुळे या मॅडम पार वैतागल्या आहेत. कधी या मुख्याध्यापकांची बदली होईल, याचीच त्या वाट बघत आहेत.

Raj Thackeray
Sakal Special : चालता...बोलता...! जय श्रीराम नव्हे, जय सियारामचा नारा द्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com