esakal | नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात होणार वाढ; महापालिकेच्या बैठकीत ठराव मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

salary increament of  Anganwadi workers

नाशिक : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात होणार वाढ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती स्वाती भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक हजार रुपयाची वाढ झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या बैठकीत एपीएल बचत गट महिला व बालकल्याण विभागाकडे नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली. आशा वर्कर, बचतगट व अंगणवाडीतील महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना या माध्यमातून मार्गदर्शन होईल. याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देऊन या विषयाला मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा: Nashik : ‘स्मार्ट’ कामे गेली गोदावरीच्या पुरात वाहून

या वेळी महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते कमलेश बोडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते अरुण पवार, विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, नंदिनी बोडके, दिक्षा लोंढे आदी पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. बैठकीस उपसभापती मीरा हांडगे, सदस्य प्रतिभा पवार, रंजना बोराडे यासह समिती सदस्य व उपायुक्त अर्चना तांबे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, नगरसचिव राजू कुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची गंभीर दखल

loading image
go to top