Nashik News: अल्पसंख्याक विभाग संलग्न अधिकाऱ्यांचे वेतन रखडले!

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान 3 महिन्यापासून प्रलंबित
No Payment
No Paymentesakal

Nashik News : राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) काही व्यवसाय विषय (ट्रेड) अल्पसंख्याक विभागाशी संलग्न आहेत.

कौशल्य विकास विभागाने पद आढावामध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाकडून निधी व पदांना तांत्रिक मंजुरी नसल्याने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील नियमित पदे असलेल्या परंतु अल्पसंख्याक विभागाशी संलग्न असलेल्या राज्यातील सुमारे ३५० अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान तीन महिन्यापासून प्रलंबित आहे.

वेतन नसल्याने तंत्रनिदेशक व शिक्षकेत्तर कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. (salary of officers attached to minority department been stopped Nashik News)

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक योजनेतील कर्मचाऱ्यांचे मार्च, एप्रिल व मे असे तीन ते चार महिन्यापासून वेतन प्रलंबित आहे. या योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास वारंवार विलंब होत असतो.

या योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे योजनेंतर्गत निधी व पदांना मुदतवाढ अभावी हे वेतन प्रलंबित असल्याचे समजते. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ५ ते ७ तारखेच्या आत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तीन महिन्याचे वेतन प्रलंबित असतानाही अद्यापही अल्पसंख्याक या योजनेचे निधी व पदांना मुदत मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

No Payment
Nashik News: देवळे येथे दारणेच्या पुलाला पुन्हा भगदाड! वाहतूक वाढल्याने वेळीच उपाययोजना गरजेची

मालेगावसह भिवंडी, भुसावळ, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, नगर यासह विविध शहरांमध्ये अल्पसंख्याक योजनेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना योजनेंतर्गत निधी व पदांना मुदतवाढ अभावी वारंवार होणाऱ्या अन्यायावर कायमस्वरूपी तोडगा काढावा याबाबत ठोस उपाययोजना करून मासिक वेतन वेळेवर व्हावे अशी अपेक्षा तंत्रनिदेशकांनी व्यक्त केली आहे.

आगामी काळातही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास कर्मचारी प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.

No Payment
Nashik News : दुसरा पावसाळा आला, तरी पूल अपूर्णच! रखडलेल्या पुलावर बिऱ्हाड आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com