Nashik News : नाशिकमधील दिव्यांगांच्या शाळांमधील शिक्षकांचे दिवाळीपासून वेतन थकीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

Nashik News : नाशिकमधील दिव्यांगांच्या शाळांमधील शिक्षकांचे दिवाळीपासून वेतन थकीत

नाशिक : येथील दिव्यांगांच्या दोन शाळांमधील शिक्षकांचे वेतन दिवाळीपासून थकले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, घरासाठीच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड अशा आर्थिक आघाड्यांवर शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. शाळांच्या अनुज्ञप्ती नूतनीकरणाचा प्रस्ताव दिव्यांग कल्याण आयुक्तालयात रेंगाळल्याने ही परिस्थिती उदभवल्याची शिक्षकांची तक्रार आहे. (Salary of teachers of disabled schools in Nashik due from Diwali Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik Sports News : महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

सरकारने दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. एवढेच नव्हे, तर अनुज्ञप्ती नूतनीकरणासाठी प्रस्ताव आयुक्तालयस्तरावर प्रलंबित असताना वेतन थांबवावे असा नियम पाहण्यात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण तरीही प्रस्ताव प्रलंबित असल्याने वेतन थकण्याचा प्रकार घडल्याने शिक्षक संताप व्यक्त करत आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयात तीन महिन्यांहून अधिक काळ प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कारण पुढे करत सामाजिक न्याय विभागाने शिक्षकांचे वेतन थांबवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु असल्याची बाब वेतनासाठी पाठपुरावा करण्याच्या निदर्शनास आला आहे. शाळांच्या अनुज्ञप्ती नूतनीकरणाचा प्रस्ताव ऑनलाइन आणि ‘हॉर्ड कॉपी’च्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. मध्यंतरी त्यासंबंधी शाळांच्या व्यवस्थापनाकडून माहिती घेण्यात आल्यावर प्रस्ताव नसल्याचे बिनदक्कपणे सांगितले गेले. मग ऑनलाइन प्रस्तावाची माहिती दिल्यावर कागदपत्रे मागवत प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आल्याचे आयुक्तालयातून सांगितले जात आहे.

"दिव्यांगांच्या शाळांसाठीच्या वेतनाचे अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना दोन महिन्याचे वेतन मिळण्यातील अडचण दूर होईल. याशिवाय इतर काही प्रश्‍न असतील, तर तेही सोडवण्यात येतील." - ओमप्रकाश देशमुख, आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे

हेही वाचा: Nashik News : सिडकोत नायलॉन मांजविक्री; तिघांना अटक