esakal | 'इथल्या' बीज केंद्रातून पंधरा दिवसांत 67 क्विंटल कांदा बियाणे विक्री...कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

onion seeds.jpg

शेतकऱ्यांकडे असणारे बियाणे देखील 4 किलोच्या पायलीला 10 ते 15 हजार रुपये या दराने मिळते. मात्र, काही कारणाने रोप उतरले नाही तर नुकसान सोसावे लागते. या उलट मान्यताप्राप्त संस्थेने विकसित केलेले सुधारित आणि संशोधित वाण वापरले तर अशा नुकसानीची शक्यता नसते.

'इथल्या' बीज केंद्रातून पंधरा दिवसांत 67 क्विंटल कांदा बियाणे विक्री...कुठे ते वाचा

sakal_logo
By
अजित देसाई

नाशिक : गेल्या हंगामात कांद्याला मिळालेले विक्रमी दर बघता या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कांदा लागवडीला प्राधान्य देण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात कांद्याचे रोप बनवण्यासाठी घरगुती बियाण्याची पुरेशी उपलब्धी होत नसल्याने दुकानदारांकडे शेतकऱ्यांची पावले वळत आहेत. तेथून चढ्या दराने बियाण्याची खरेदी करण्यात येत आहेत.

कांद्याची ठळक वैशिष्ट्ये

कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने देखील माफक दरात कांदा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या 6 ऑगस्टपासून या केंद्रावर 67 क्विंटल बियाणे विक्री करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. राष्‍ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्था अर्थात एनएचआरडीएफ या केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली संस्थेने यंदाच्या हंगामासाठी 'ॲग्री फाऊंड लाईट रेड' हे वाण विकसित केले आहे. जुन्या गावरान कांद्यामधून निवड पद्धतीने हे बियाणे तयार करण्यात आले आहे. गुलाबी आणि भगवा रंग,साठवणूक कालावधी अधिक, हेक्टरी उत्पादन 350 ते 400 क्विंटलपर्यंत, 120 दिवसांचा पीक कालावधी ही या कांद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. 

टप्प्याटप्प्याने बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होतील

सिन्नर येथील कुंदेवाडी केंद्रावर ऍग्री फाऊंड सोबतच शेतकऱ्यांची मागणी असणाऱ्या रेड-3 या बियाण्याची देखील विक्री करण्यात आली. मात्र, हे बियाणे अवघे 25 क्विंटल एवढेच उपलब्ध झाले होते. 2300 रुपये किलो दराने हे बियाणे विक्री करण्यात आले तर 'ऍग्री फाऊंड' हे वाण 2000 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध आहे. आज गुरुवारी (ता. 20) पर्यंत या प्रकारात 43 क्विंटल बियाणे विक्री करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने आणखी 10 क्विंटलपर्यंत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती केंद्र प्रमुख बी.पी.रायते यांनी दिली.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

खाजगी कंपन्यांच्या तुलनेत वाजवी दर...

बाहेर दुकानांमध्ये अडीच ते तीन हजार रुपये प्रतिकिलो या दराने कांदा बियाणे उपलब्ध आहे. त्या तुलनेत एनएचआरडीएफ मार्फत वाजवी दरात गुणवत्तापूर्ण बियाणे विक्री करण्यात येते. शेतकऱ्यांकडे असणारे बियाणे देखील 4 किलोच्या पायलीला 10 ते 15 हजार रुपये या दराने मिळते. मात्र, काही कारणाने रोप उतरले नाही तर नुकसान सोसावे लागते. या उलट मान्यताप्राप्त संस्थेने विकसित केलेले सुधारित आणि संशोधित वाण वापरले तर अशा नुकसानीची शक्यता नसते.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top