भात अन् मक्याच्या बियाण्यांची 120 क्विंटल विक्री

नाशिक जिल्ह्यात तीन वर्षांत खतांचा किती वापर झाला आणि सद्यःस्थिती काय आहे, याची जंत्री कृषी विभागाने जुळवून ठेवली आहे.
Rice and corn
Rice and cornesakal

नाशिक : नाशिक विभागातील कृषीच्या खरीप हंगाम तयारी आढावा बैठकीत सचिव एकनाथ डवले यांनी कापूस, सोयाबीन, मक्याला मिळालेल्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांचा कल यंदा कसा राहील, याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केली. पण मॉन्सूनचे चित्र अद्याप स्पष्ट होत नसल्याने अजूनही कृषी विभाग तयारीच्या आकडेवारीभोवती खेळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आतापर्यंत भाताची १०० आणि मक्याची २० अशी एकूण १२० क्विंटल बियाणे विकली गेली आहेत. त्याचवेळी मॉन्सूनचे पुढील महिन्यात आगमन झाल्यावर बियाण्यांसह खतांच्या खरेदीकडे कल वाढणार असला, तरीही खतांचे त्रांगडे अजूनही अस्पष्ट आहे.

जिल्ह्यात तीन वर्षांत खतांचा किती वापर झाला आणि सद्यःस्थिती काय आहे, याची जंत्री कृषी विभागाने जुळवून ठेवली आहे. गेल्या वर्षी मे-जूनमध्ये ३३ हजार ४३ टन युरियाची विक्री झाली होती. आता ३१ हजार ९३४ टन यूरिया उपलब्ध असल्याचे कृषीच्या आकडेवारीवरून दिसते. मग यूरियाची मागणी वाढल्यावर काय? या प्रश्‍नाची माहिती घेतल्यावर पुढील महिन्यात आणखी यूरिया उपलब्ध होणार असल्याचे सांगून यंत्रणा नामानिराळी झाली. डीएपी आणि मिश्र खते गेल्या वर्षी ४० हजार टन खपली होती. आता ही खते ४७ हजार टन उपलब्ध आहेत. ही खते पुरेशी ठरतील काय? हे विचारल्यावर शेतकऱ्यांनी विशिष्ठ ग्रेड आणि कंपन्यांचा आग्रह न धरता इतर पर्यायी खतांचा वापर करत खर्चात बचत करावी, असे उत्तर मिळाले. एमओपी खते गेल्या वर्षी एक हजार ३९३ टन विकली गेली. आता दोन हजार टन एमओपी खते उपलब्ध आहेत. एसएसपी खतांची विक्री गेल्या वर्षी दहा हजार ४९७ टन झाली होती. यंदा हीच खते १२ हजार टन उपलब्ध आहेत. श्री. डवले यांनी फलोत्पादन क्षेत्राचा जिल्हा असल्याने खते नेमकी किती लागतील, याचा आढावा घ्यावा असे स्पष्ट करत ‘बफर स्टॉक’साठी १५ मेनंतर खते मिळणार नाहीत, असा इशारा दिला होता.

Rice and corn
इंधनावरील कर कपातीची घोषणा हवेतच

खतांबाबत तक्रारी येणार?

‘बफर स्टॉक’ची माहिती घेतल्यावर अजूनही ६६ टक्के खतांचा ‘बफर स्टॉक’ झाला आहे. युरियासाठी सहा हजार १६० टनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी चार हजार ५० टन साठा झाला आहे. ‘डीएपी’च्या दोन हजार १९० टनापैकी दीड हजार टन साठा झाला आहे. ही सारी परिस्थिती पाहता, पाऊस होताच, जिल्ह्यात बियाण्यांच्या जोडीला खतांच्या तक्रारींना तोंड फुटण्याची शक्यता आहे.


बीटी कॉटनचा प्रश्‍न ऐरणीवर

कापसावरील रोगकीडीची ‘सायकल’ खंडित करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार येत्या १ जूनपासून बीटी कॉटन बियाण्यांची विक्री सुरू करावी, असे धोरण कृषी विभागाने स्वीकारले आहे. त्यासंबंधाने आता बीटी कॉटन बियाण्याची विक्री सुरू करण्यासाठी चार दिवस उरले असताना जिल्ह्यात काय स्थिती आहे, याची माहिती घेतली. त्यावेळी ४१ हजार ४१८ हेक्टरसाठी एक लाख ६५ हजारांहून अधिक पाकिटांची गरज भासेल, असा ठोकताळा बांधला होता. सद्यःस्थितीत १२ हजार १२० पाकिटे उपलब्ध झाली आहेत. एकूणात चांगल्या भावामुळे वाढणाऱ्या क्षेत्राचा विचार केला नाही, तरीही आवश्‍यकतेच्या तुलनेत खूपच कमी बियाणे उपलब्ध असल्याने कापसाच्या बियाण्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

प्रात्यक्षिक करायचे कशाने?

कपाशीसारखीच स्थिती मक्याच्या बियाण्यांची होण्याची चिन्हे दिसताहेत. दोन लाख ३४ हजार ४७० हेक्टरवर मक्याची लागवड करण्यासाठी ४६ हजार ८९४ क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता भासणार आहे. त्यापैकी ११ हजार ९२३ क्विंटल मक्याचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीनचे बियाणे वापरावे, यासाठी कृषी विभागाचा आग्रह आहे. मात्र सोयाबीनच्या प्रात्यक्षिकांसाठी बियाणे कोठून आणायचे, असा प्रश्‍न कृषी विभागापुढे आहे. सोयाबीनच्या ९७ हजार ८०२ हेक्टरसाठी २५ हजार ६७३ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. १५ हजार ९९ क्विंटल बियाणे कंपन्यांनी बाजारात विक्रीसाठी आणले आहे. ९४ हजार २६३ हेक्टर भाताच्या लागवडीसाठी १८ हजार ८५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. बाजारात सहा हजार ९४९ क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. संकरित व सुधारित बाजरीच्या ७९ हजार ४०७ हेक्टरसाठी दोन हजार ४०१ क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता असून, ८७० क्विंटल विक्रीसाठी दाखल झाले आहे.

Rice and corn
कोरोना प्रादुर्भाव कमी होताच विवाह नोंदणीत वाढ

खरिपासाठी बियाण्यांची स्थिती

० पेरणीचे उद्दिष्ट : सहा लाख ३२ हजार ५८५ हेक्टर
० बियाण्यांची गरज : ९६ हजार ४७ क्विंटल
० विक्रीसाठी उपलब्ध बियाणे : ३४ हजार ४८१ क्विंटल

रासायनिक खतांची उपलब्धता

(आकडे टनामध्ये)
० खरिपासाठी मंजूर : दोन लाख ३२ हजार ८१०
० जिल्ह्यासाठी नोंदवण्यात आलेली मागणी : दोन लाख ६० हजार
० मेअखेर करावयाचा पुरवठा : ६७ हजार ५१४
० रब्बीमधील शिल्लक साठा : एक हजार ११९
० आजअखेर प्राप्त पुरवठा : ५२ हजार ६८५
० मेअखेर उपलब्ध होणारा साठा : ७६ हजार ७६३
० एमएफएमएस प्रणालीवर उपलब्ध साठा : ६३ हजार २७१
० आजअखेर एमएफएमएस प्रणालीवर शिल्लक साठा : ९४ हजार १४४
० आतापर्यंत विकण्यात आलेली खते : २३ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com