देशी दारूवर ‘बारा’चा उतारा! राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ

Deshi Daru
Deshi Daruesakal

नाशिक : राज्य सरकारने विदेशी दारूचे दर ५० टक्क्यांनी कमी करून एकीकडे श्रीमंतांना दिलासा दिला असताना अनेक ठिकाणी देशी दारूची मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबधित प्रकारापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असल्याने सामान्यांची लूट, तर श्रीमंतांना पायघड्या का, असा प्रश्‍न तळीरामांकडून विचारला जात आहे.

तळीरामांच्या खिशाला कात्री

कोरोनाकाळात मद्याची दुप्पट, तिप्पट नव्हे तर चौपट दराने विक्री झाली. त्यातून कोणाला किती ‘अर्थ’लाभ झाला, हा विषय संशोधनाचा ठरावा. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात वाइन शॉप व सरकारमान्य देशी दारूच्या दुकानातून मूळ किमतीपेक्षा ५ ते १२ रुपये जास्त आकारले जात आहेत. त्यामुळे तळीरामांच्या खिशाला कात्री लागली. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर तळीरामांना दिलासा मिळाला. देशीसह विदेशी दारू मूळ किमतीत मिळू लागल्याने तळीरामांनी आनंद व्यक्त केला.

Deshi Daru
तिने सोडली पोलिसांची नोकरी अन् झाली सोशल मीडिया स्टार

दरम्यान, मागच्याच आठवड्यात राज्य शासनाने परदेशातून आयात होणाऱ्या विदेशी दारूचे दर ५० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करून उच्चभ्रू वर्गातील तळीरामांना दिलासा दिला. दुसरीकडे मात्र गरीब वर्गातील मद्यपींना देशी दारू मूळ किंमत ६० रुपयांऐवजी ७० ते ७२ रुपये दराने विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढीव दराबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयालगतच्या एका सरकारमान्य देशी दारू दुकानामधूनही ७० रुपयांना देशी दारूची विक्री केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग याप्रश्नी अनभिज्ञ असल्याने कमालीचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

भरारी पथके नावालाच

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तीन तालुक्यांसाठी भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. बनावट दारूविक्रीबरोबरच परराज्यातून विनापरवाना दारू वाहतुकीवर पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरातील सर्वच आस्थापनांमध्ये मूळ किमतीपेक्षा ५ ते १२ रुपये जास्त आकारले जात असताना याकडे भरारी पथकांचे दुर्लक्ष कसे, हा प्रश्‍न विचारला जात आहे.

परवडत नसल्याने जादा दर

देशी दारूची चढ्या दराने विक्री होत असल्याबाबत विक्रेत्यांना विचारणा केली असता, देशी दारूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आम्हाला परवडत नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, परवडत का नाही, या प्रश्‍नावर विक्रेत्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

Deshi Daru
‘ओमीक्रॉन’चे कडवे आव्हान ?

''देशी दारूचे दर वाढलेले नाहीत. तसे कुठलेही आदेश आम्ही आस्थापनांना दिलेले नाहीत. चढ्या दराने देशी दारू विक्री होत असेल तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.'' - बी. एन. भुतकर, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com