esakal | संदीप गुळवे पुन्हा स्वगृही; जिल्हा कॉंग्रेसला येणार अच्छे दिन?
sakal

बोलून बातमी शोधा

sandeep gulve

संदीप गुळवे पुन्हा स्वगृही; जिल्हा कॉंग्रेसला येणार अच्छे दिन?

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी ( जि. नाशिक) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस व व पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते संदीप गुळवे अॅड. संदीप गुळवे यांनी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,महिला प्रदेश अध्यक्षा चारुलता राव,आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतून, जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात बॉम्बगोळा टाकून सर्वच राजकीय जाणकारांना अचंबित केले आहे. स्वगृही परतल्याने जिल्हा कॉंग्रेसला अच्छे दिन येणार आहे. तालुक्यासह जिल्हाभरातून जुन्या कॉंग्रेस पदाधिकारी यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'

गुळवे यांनी अनपेक्षितपणे केलेलं पक्षांतराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. पक्ष श्रेष्टींनी थेट पक्षात परतण्याचे आवताण धाडल्याने स्वगृही परतल्याने सहकार क्षेत्रात व ग्रामीण भागातही कॉंग्रेस मजबूत होणार आहे. पक्ष श्रेष्टींनी राजकीय पूनर्वसनाबाबत गुप्त खलबते बंद दाराआड झालेल्या बैठकीबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटले आहे. मात्र यावर लगेच प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पदाधिकारी,कार्यकर्त्यांना कुतुहालाचा विषय

राजकारणाचे बाळकडू कॉंग्रेसकडून मिळालेल्या गुळवे यांची पुढील ध्येय हि ठरलेले असते. त्यांच्यावर युवकांचा असलेला विश्वास व ( स्व.) गोपाळराव गुळवे याचा वारसा,पुढे चालविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्नेयास अनेक पदाधिकारी यांनी होकार दर्शवला आहे. पुढील राजकीय पुनर्वसन सर्वसामान्य पदाधिकारी,कार्यकर्ते यांना कुतुहालाचा विषय ठरणार आहे.

हेही वाचा: नोकरभरतीच्या विलंबामुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी; वय वाढल्याने भीती

जिल्ह्यात कॉंग्रेसला निश्चित अच्छे दिन?

इगतपुरी-त्र्यंबकेश्वरसह जिल्हाभरात कार्यकर्त्यांसह सहकार क्षेत्रात मजबूत पकड आहे. सन २०१८मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका आठ महिन्यांवर येवून ठेपल्याने गुळवे यांच्या राजकीय वजाबेरीजेचा धांडोळा मात्र जिल्ह्यात कॉंग्रेसला निश्चित अच्छे दिन आणेल यावर स्वगृही परतल्याने एकदाचे शिक्कामोर्तब झाले आहे.