होर्डिंगवरील कारवाई संजय राऊतांच्या सांगण्यावरून; मनसेचा आरोप

sandip deshpande allege removal of mns hoardings in nashik at the behest of sanjay raut
sandip deshpande allege removal of mns hoardings in nashik at the behest of sanjay raut Google

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या राज व अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागतार्ह बॅनरवर पोलिस व महापालिकेच्या पथकाने संयुक्त कारवाई केल्याने या मोहिमेला राजकीय तडका मिळाला. मनसेच्या कार्यकर्त्यांना हेतुपूर्वक बॅनर हटविल्याचा आरोप करताना रास्ता रोको केला, तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा आरोप मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला.


दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज व अमित ठाकरे नाशिकमध्ये आले. हॉटेल एसएसके येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा व पक्षाचे ज्येष्ठ नेते मुक्कामाला असल्याने या भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागतार्ह बॅनर लावले. परंतु, लावलेले होर्डिंग अनधिकृत ठरवत महापालिका व पोलिसांनी हटविले व मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार कारवाई केल्याचा दावा या वेळी करण्यात आला. परंतु, या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. शहरात सत्ताधारी भाजपसह शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले असताना त्यावर कारवाई का नाही, असा सवाल करण्यात आला. राज ठाकरे यांच्या होर्डिंगवर करण्यात आलेली कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप करण्यात आला.

sandip deshpande allege removal of mns hoardings in nashik at the behest of sanjay raut
मनसेच्या विनापरवानगी होर्डिंगला दणका; पदाधिकाऱ्यांचा गोंधळ


कारवाई विरोधात रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न झाला. या वेळी महापालिका व पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा आरोप मनसैनिकांनी केल्याने मनसे व शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या सांगण्यावरून होर्डिंग हटविण्यात आले असून, पोलिसांनी आकसबुद्धीने केलेली कारवाई चुकीची आहे.
- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे.

sandip deshpande allege removal of mns hoardings in nashik at the behest of sanjay raut
गोदेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com