Nashik News : Damage Controlसाठी संजय राऊत नाशिकच्या मैदानात; 12 माजी नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर

 sanjay raut
sanjay raut Esakal

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटातील प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. प्रवेशापूर्वीच कुणकूण बाहेर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवेश होईपर्यंत मधल्या काळात डॅमेज कंट्रोलसाठी प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना नाशिकमध्ये पाठवण्याचा निर्णय मातोश्रीवरून घेण्यात आल्याचे समजते. १ व २ डिसेंबर या दोन दिवसात राऊत नाशिकमध्ये येऊन नगरसेवकांशी वन टू वन चर्चा करणार करणार असल्याचे समजते. (Sanjay Raut for Damage Control at Nashik Ground Admission of 12 former corporators delayed Nashik Latest Political News)

जून महिन्यात राज्यात सत्तांतर होताना शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. राज्यातील सत्ता तर गेलीच त्या व्यतिरिक्त शिवसेनेलादेखील पोखरण्याचे काम शिंदे गटाकडून सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष करून शहरी भागाकडे शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे.

त्यातही मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकांवर कब्जा मिळवण्यासाठी तेथे शिवसेनेतील नाराजांना गटात आणले जात आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाला फारसे यश मिळाले नाही. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, माजी नगरसेवक श्याम साबळे व प्रवीण तिदमे यांच्या व्यतिरिक्त दमदार नेते अजून आले नाही.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

 sanjay raut
Agniveer Recruitment : पाडळीतील 8 तरुण सैन्य दलात भरती; गावातील तरुण पहिल्यांदाच सीमेवर

मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील १२ ते १५ माजी नगरसेवक संपर्कात आले. मंगळवारी (ता. २९) प्रवेश निश्चितदेखील झाला. मात्र त्यापूर्वीच काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याची कुणकूण बाहेर आल्यानंतर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती निर्माण झाल्याने प्रवेश लांबणीवर पडला आहे. मात्र, माजी नगरसेवकांच्या प्रवेशाची दखल मातोश्रीवर घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या भक्कम गडाचे बुरूज ढासळण्यापूर्वीच डागडुजी करण्यासाठी प्रवक्ते संजय राऊत यांना नाशिकमध्ये पाचारण करण्यात आले आहे.

संघटनात्मक कुरकूर नाराजीला कारणीभूत

जे १२ ते १५ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहे, त्यांच्या नाराजी मागे संघटनात्मक कुरबुरी कारणीभूत असल्याचे समजते. अशा नगरसेवकांशी वन टू वन चर्चा खासदार संजय राऊत करणार आहे. डॅमेज कंट्रोलसाठी राऊत यांचा दौरा होईल की नाही, याबाबत स्पष्टोक्ती नसली तरी राऊत यांचा नियमित मासिक दौरा असल्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

 sanjay raut
Champa Shashti Nashik : चांदीचा खंडोबा पालखी अन् रथोत्सव; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com