Sanjay Raut | सुनील बागूल हे कडवट शिवसैनिक : खासदार राऊत यांचे गौरवउदगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Raut cutting the cake on the occasion of Sunil Bagul's obituary ceremony.

Sanjay Raut | सुनील बागूल हे कडवट शिवसैनिक : खासदार राऊत यांचे गौरवउदगार

पंचवटी (जि. नाशिक) : शिवसेना नाशिक शहरात आणि जिल्ह्यात जी वाढत गेली. ती बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक सुनील बागूल यांच्यासारख्या शिवसैनिकामुळे, बागूल यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.

त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिवसेनेवर त्यांची एक छाप पडलेली आहे. असे गौरवोद्गार शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना उपनेते तथा श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल यांचा ५९ वा अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काढले.

तसेच यावेळी रामवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तर टॅक्सी धारकांना विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले. (Sanjay Raut statement Praise about Sunil Bagul as Shiv Sainik nashik political news)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व रवींद्र पैठणे गुरुजी तसेच गौतमी गोदावरी वैदिक गुरुकुलमधील २५ बटुक ब्राह्मणांच्या वेद मंत्रोच्चारात आणि घरातील महिलांच्या हस्ते औक्षण करत अभीष्टचिंतन सोहळ्यास सुरवात करण्यात आली.

रामवाडी येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच टॅक्सीचालकांना विमा वाटप करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर भिकूबाई बागूल, आमदार दिलीप बनकर, संजय सावंत, तुळशीराम गुट्टे महाराज, वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

तसेच या वेळी शुभांगी पाटील, शोभा मगर, मंगला भास्कर, भगवान पाठक, डि जी सूर्यवंशी, मामा राजवाडे, विलास शिंदे, सचिन राणे, दीपक केदार, देवानंद बिरारी, निखिल पवार, प्रदिप पताडे, बाळा दराडे, योगेश पाटील, भास्कर गावित, शोभा मगर, विलास शिंदे, रश्मी हिरे, करण गायकर, प्रथमेश गिते यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय बागूल, अजय बागूल, किशोर बागूल, निखिल बागूल, गुलाब भोये, मनीष बागूल, राजेंद्र वाकसरे, बाळासाहेब पाठक, बाळासाहेब कोकणे प्रयत्नशील होते.