
Nashik News : संत गाडगे महाराज उद्यान समस्यांच्या गर्तेत; उद्यान असून नसल्यासारखे
सिडको (जि. नाशिक) : परिसरातील पाटीलनगर येथील संत गाडगे महाराज उद्यान समस्यांच्या गर्तेत असून तुटलेल्या खेळणी, भटके श्वान, प्रेमीयुगुल व मद्यपींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. (Sant Gadge Maharaj Udyan in midst of problems Nashik News)
संत गाडगे महाराज उद्यान परिसराच्या सभोवताली तीन ते चार हजार लोकसंख्या असून येथील रहिवासी सकाळ, सायंकाळ उद्यानाचा वापर करत असतात. परंतु, समस्या महापालिका प्रशासन सोडवत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. उद्यानामध्ये खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून ग्रीन जिमच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर पाणी मारले जात असल्याने चिखल झाला आहे.
काही साहित्य उपयोगातच येत नाही. उद्यानात प्रेमीयुगुलांचा वावर असल्याने महिला उद्यानात येण्यासाठी टाळाटाळ करत असून, लहान मुलांनादेखील उद्यानात पाठवत नाहीत. रात्री उद्यानात व उद्यानाच्या बाहेरील बाजूस मद्यपींचा धिंगाणा सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथे पोलिसांनी गस्त देणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
हेही वाचा: Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!
संत गाडगे महाराज उद्यान
* खेळणी तुटलेल्या अवस्थेत
* ग्रीन जिमचा काही साहित्याचा उपयोगच नाही.
* कचऱ्याचे साम्राज्य
* पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
* मद्यपींचा वावर
* प्रेमीयुगुलांचा स्थानिकांना त्रास
* मोकाट कुत्र्यांचा उद्यानात वावर
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
हेही वाचा: NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!
"उद्यानात सकाळ, सायंकाळ प्रेमीयुगुलांचा वावर असून लहान मुलांना उद्यानात आणावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यान व्यवस्थापनाने यावर काही उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे." - सुरेखा पाटील, गृहिणी
"उद्यानामध्ये व बाहेरील बाजूस सांयकाळी सातनंतर मद्यपींचा वावर वाढत असून, येथे पोलिस प्रशासनाने गस्त देणे अत्यावश्यक आहे. टवाळखोरांकडून शिवीगाळ करणे व इतर गैरप्रकार घडत असून यावर अंकुश लावणे गरजेचे आहे."- कल्पना जाधव, गृहिणी
"उद्यानात गरजेपेक्षा जास्त पाणी मारले जात असून येथे झालेल्या चिखलात लहान मुले खेळण्यासाठी आल्यानंतर कपडे खराब तर होतातच परंतु खेळताना सडकून पडत असल्याने त्यांना शारीरिक इजादेखील होते."- अश्विनी सोनजे, गृहिणी
"उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून मद्यपी याच कचऱ्यात त्यांचे साहित्य फेकत असतात. लहान मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून येथील अनेक नळांची कॉक खराब झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीदेखील वाया जात असते."- सोनल महाजन, गृहिणी
हेही वाचा: Nashik Crime News : घराचे आमिष दाखवून भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार