Saptashrungi Devi : आदिमायेचे ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधा पूर्ववत

Saptashrungi Devi Wani gad
Saptashrungi Devi Wani gadesakal

Saptashrungi Devi : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील आदिमायेचे चैत्रोत्सव कालावधीत बंद करण्यात आलेले ऐच्छिक व्हीआयपी दर्शन सशुल्कची व्यवस्था श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने १३ एप्रिल पासून पूर्ववत करण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने देण्यात आली. (Saptashrungi Devi Voluntary paid VIP darshan facility of Adimaya restored nashik news)

सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत, डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फूट उंचीवर असलेल्या आदिमाया सप्तशृंगीचे भक्तीशक्तीचे त्रिगुणात्मक रूप असलेला सप्तशृंगी (वणी) गड ह्या तीर्थक्षेत्री आदिमायेच्या दर्शनासाठी तसेच निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दररोजचे हजारो भाविक व पर्यटक गडावर हजेरी लावतात.

आदिमायेचे चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कावडयात्रा प्रमुख उत्सवात तसेच दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी, शाकंभरी नवरात्रोत्सव, धनुर्मास, श्रावण महिन्यात गडावर दररोज लाखोंची गर्दी असते. वर्षभरात या ठिकाणी सुमारे ४० ते ४५ लाख भाविक हजेरी लावतात.

मंदिराची व्यवस्थापन संस्था असलेल्या सप्तशृंग निवासिनी देवी विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात निवास व्यवस्था तसेच ना नफा ना तोटा या तत्त्वावर रु. २० या अल्पदरात प्रसादालय भोजन व्यवस्था कार्यान्वित केलेले आहे.

विश्वस्त मंडळामार्फत नव्यानेच श्री भगवती मंदिर जीर्णोद्धाराचे काम व श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत काम हाती घेण्यात आले असून श्री भगवती मंदिर सभामंडपाच्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी व निधी आवश्यक आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Saptashrungi Devi Wani gad
Nashik News : आता शासकीय योजनांचीही भरणार जत्रा! आजपासून महिनाभर चालणार यात्रेची तयारी

तसेच श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदी अपेक्षित असून त्यात भाविक स्वच्छेने योगदान देत आहेत. वर्षभरातील चैत्र व नवरात्रोत्सव पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा १३ फेब्रुवारीपासून केलेली आहे. मात्र चैत्रोत्सव काळात सदरचे सशुल्क व्हीआयपी दर्शनाची सुविधा ३० मार्च ते १२ एप्रिल पर्यंत बंद करण्यात आलेली होती.

आता ती गुरुवार (ता.१३) पासून पूर्ववत कार्यान्वित करण्यात आली असून सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक आहे. सर्वसामान्य भाविकांना दर्शन व्यवस्था आहे, तशी उपलब्ध असेल.

ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निःशुल्क असेल. सदर सशुल्क व्हीआयपी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९ ते ६ वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध असेल.

Saptashrungi Devi Wani gad
Nashik News : जुन्या अटींसह नोकरभरतीची धूळफेक; MPSCच्या धोरणाने युवकांत अस्वस्थता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com