

Devotees Vehicle Crashes Into Gorge at Saptashrungi
Esakal
दिगंबर पाटोळे, वणी : नाशिकमध्ये स्विफ्ट कार सप्तश्रृंग गड घाटातील दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते. ३०० फूटांपेक्षा जास्त खोल दरीत कार कोसळळी आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या दोन रुग्णवाहिकांसह आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक रवाना झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.