jewellery shopping
jewellery shoppingesakal

Nashik: ग्राहकांच्‍या प्रतिसादाने सराफी पेढीला झळाळी! गतवर्षीच्‍या तुलनेत व्‍यवसायात 15 टक्क्‍यांपर्यंत नोंदविली वाढ

Nashik News : दसऱ्याचे औचित्‍य साधत सोने खरेदीचा मुहूर्त अनेक ग्राहकांनी मंगळवारी (ता. २४) साधला. पारंपारिक सराफी पेढी असलेल्‍या सराफ बाजारासह गंगापूर रोड आणि कॅनडा कॉर्नर भागातील सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांनी दिलेल्‍या प्रतिसाद दिला.

यामुळे सराफी पेढ्यांना झळाळी आली होती. मागील वर्षाच्‍या तुलनेत व्‍यवसायात १५ टक्क्‍यांपर्यंत वाढ झाल्‍याचे व्‍यावसायिकांनी सांगितले. (Sarafi Pedhi excited by customer response Up to 15 percent increase in business compared to last year Nashik)

सण उत्‍सवात सोने खरेदी शुभ मानले जाते. महत्त्वाच्‍या मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्यानिमित्त ग्राहकांनी सोने खरेदीचा योग साधला. येणाऱ्या ग्राहकांची मागणी लक्षात घेता अगदी १ ग्रॅमच्‍या दागिन्‍यापासून भरपूर पर्याय उपलब्‍ध करून दिले होते.

दिवसभर सराफीपेढ्या ग्राहकांनी गजबजल्‍या होत्‍या. सायंकाळी उशिरापर्यंत ग्राहकांनी दालन गजबजले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्‍यावसायिकांकडून विविध योजना उपलब्‍ध होत्‍या.

यामध्ये ठराविक खरेदीवर भेटवस्‍तू, घडवणूकीवर २५ टक्क्‍यांपर्यंत सवलत यासह इतर योजनांचा समावेश होता. मयूर अलंकार यांच्‍या सराफ बाजारातील तसेच गंगापूर रोडवरील पेढीतही दिवसभर गर्दी बघायला मिळाली.

ग्राहकांच्‍या सोयीसाठी सकाळी आठपासून दालन खुले करण्यात आले होते. आगामी लग्‍नसराईनिमित्त श्रीमंत पेशवाई दागिनांची श्रृंखला उपलब्‍ध करून दिलेली असताना, त्‍यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

jewellery shopping
Dasara 2023 : धुळ्यात 75 कोटींची उलाढाल; सीमोल्लंघनासह वाहने, सोने खरेदीसाठी गर्दी

पितृपक्षातील बुकिंगची डिलिव्हरी

काही दिवसांपूर्वी पितृपक्ष कालावधीत सोन्‍याचे दर काही प्रमाणात घटले होते. यादरम्‍यान सोन्‍याची बुकिंग करताना अनेक ग्राहकांनी मंगळवारी दागिन्‍यांची डिलिव्‍हरी घेतली.

तर नव्‍याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी २४ कॅरेटच्‍या सोन्‍यासाठी ६० हजार ८०० इतका दर राहिला. इस्राईल-गाजा युद्धाचा भडका सुरू राहिला तर दिवाळीपर्यंत दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्‍यावसायिकांनी वर्तविली आहे.

"पितृपक्षात सोन्याचे भाव स्थिर असल्‍याने ग्राहकांनी आगाऊ बुकिंग करत आज सोने-चांदीचे दागिने घरी नेले. दिवाळी, लग्नसराईमुळे दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदी केले. आमच्याकडे नव्याने अवगत केलेल्‍या प्रीमिअम पेशवाई, टर्की लाइटवेट दागिन्यांच्या कलेक्शनला ग्राहकांनी पसंती दिली. सोन्याची भाववाढ झाली असली, तरी आणखी वाढीच्‍या शक्यतेने गुंतवणूक म्हणून काही ग्राहकांनी सोने खरेदी केले."

-मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार, गंगापूर रोड.

jewellery shopping
Dasra Melava: दसरा मेळावा पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com