Nashik News: सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण कायम! अधिकार कायम ठेवत ग्रामसेविकेचा पदभार काढण्याचा प्रस्तावाला विरोध

Sarpanch Vaishali Pawar taking care of a small baby at the hunger strike site. Police Inspector Pritam Chaudhary, In-charge Group Development Officer Sandeep Dalvi while discussing with Shekhar Pagar and other hunger strikers.
Sarpanch Vaishali Pawar taking care of a small baby at the hunger strike site. Police Inspector Pritam Chaudhary, In-charge Group Development Officer Sandeep Dalvi while discussing with Shekhar Pagar and other hunger strikers.esakal

नांदगाव : मंगळणे येथील ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांना सोपविण्यात आलेला प्रभारी पदभार काढून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून बेमुदत उपोषण करणाऱ्या मंगळणे (ता. नांदगाव) येथील सरपंच वैशाली पवार यांचे उपोषण आज सलग सातव्या दिवशी सुरूच होते.

दरम्यान सरपंच श्रीमती. पवार या आपल्या तीन महिन्याच्या लेकरासह बेमुदत उपोषण करीत असल्याने या उपोषणातले गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.४) तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. (Sarpanch Vaishali Pawar hunger strike continues Opposition to proposal to remove post of gramsevika while retaining rights Nashik News)

मंगळणे येथील ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेत तो पदभार भौरी (ता. नांदगाव) येथील मिलिंद सोनवणे यांच्याकडे देत असल्याचे आदेश प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांनी काढले होते.

तसे लेखी आदेशाची प्रत उपोषणकर्त्या सरपंच वैशाली पवार यांना देण्यात आली. मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या या आदेशात अतिक्रमण हटविणे बाबतची कार्यवाही ही ग्रामसेविका श्रीमती. आहेर यांनीच करावी असा उल्लेख केला.

तसेच याबाबत दिवाणी न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये ग्रामसेविका असलेल्या आहेर या स्वतः प्रतिवादी असल्यामुळे कोर्टाच्या निकालापर्यंत सदर केसची त्यांनी नस्ती हाताळावी व तसा अहवाल वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयास सादर करावा असे गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले.

शिवाय ग्रामसेविका श्रीमती. आहेर यांनी त्यांच्याकडील दिवाणी न्यायालयातील केस वगळता त्यांच्याकडे असलेला मंगळणे ग्रामपंचायतीचा संपूर्ण कार्यभार ग्रामसेवक मिलिंद सोनवणे यांच्याकडे हस्तांतरित करावा असेही गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले.

Sarpanch Vaishali Pawar taking care of a small baby at the hunger strike site. Police Inspector Pritam Chaudhary, In-charge Group Development Officer Sandeep Dalvi while discussing with Shekhar Pagar and other hunger strikers.
Nashik Rice Crop News: इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यात! मजुरीचा खर्च डोईजड

मात्र श्री. दळवी यांनी काढलेल्या या आदेशाला सरपंच वैशाली पवार आणि लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांच्यावतीने आक्षेप घेण्यात आला.

जर उपोषणावर तोडगा काढायचा होता तर अटी व शर्ती ठेवून पदभार दुसऱ्याकडे कुठल्या आधारे हस्तांतरित होत असतो असा हरकतीचा मुद्दा शेखर पगार यांनी उपस्थितीत करताना एकीकडे पदभार काढून घ्यायचा होता.

तो सरळ सरळ का काढत नाही अशी संदिग्धता ठेवून काम करणारी पंचायत समितीची यंत्रणा एकमेव असावी त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत संशयाला जागा उरते असा आरोप शेखर पगार यांनी केला.

न्याय मागणाऱ्या आदिवासी महिला सरपंचाची अशी हेळसांड होऊन देखील जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय यंत्रणा यात हस्तक्षेप करीत नसून याउलट दुर्लक्ष केल्याची भावना श्रीमती. पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे श्रीमती. पवार याचे बेमुदत उपोषण हे सातव्या दिवशी देखील सुरुच होते.

Sarpanch Vaishali Pawar taking care of a small baby at the hunger strike site. Police Inspector Pritam Chaudhary, In-charge Group Development Officer Sandeep Dalvi while discussing with Shekhar Pagar and other hunger strikers.
Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला 37 हजार 500 भरपाई; तहसीलदार बारवकर यांची तत्परता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com