Satana farmers protest
sakal
सटाणा: तालुक्यातील शेतकरी पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त झाला असून, त्यांचा शेतमाल, दुभती जनावरे, फळबागा, घरे आणि भवितव्य हे सर्वस्व पाण्यात वाहून गेले आहे. हताश शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, तर त्यांच्या कुटुंबीयांना दोन वेळच्या भाकरीचीही चिंता भेडसावत आहे. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे देण्यात आला आहे.