Fraud Case
sakal
सटाणा: जादा परताव्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘सुवर्ण इंद्रधनू फ्रंटर्निटी फंड’ या कंपनीच्या संचालकांसह सटाणा उपशाखेतील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रारंभी २२ गुंतवणूकदारांची ३५ लाख ४८ हजार ७९ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असले तरी आणखी शंभराहून अधिक नागरिक पुढे येण्याच्या तयारीत असून, ही रक्कम कोटींमध्ये जाण्याची शक्यता पोलिससूत्रांनी व्यक्त केली आहे.