Elections
sakal
सटाणा: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हौशी सत्ताधीश नकोत, जनसेवक हवेत’, ‘शपथपत्राशिवाय मत नाही’ या मोहिमेची शहरात एकच चर्चा आहे. सुजाण नागरिकांचा या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहरातील निवडणूक आता केवळ सत्तास्पर्धा न राहता लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करणारे आंदोलन ठरत आहे.